Nashik : भिंतीत लपवल्या नोटा, नाशिकमध्ये ज्वेलर्स मालकाच्या घरात 26 कोटींचे घबाड

मुंबई तक

26 May 2024 (अपडेटेड: 26 May 2024, 03:21 PM)

Surana Jewellers :नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या सुराणा ज्वेलर्सवर मालकाने केलेल्या कथित अज्ञात व्यवहाराच्या तपासासाठी मोठा छापा टाकण्यात आला होता. आयकर विभागाने एकाचवेळी ज्वेलर्सच्या दुकानावर आणि मालकाच्या घरावर छापे टाकले होते

आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे

income tax raids surana jewellers in nashik seizes 26 crore cash and property worth 90 crore

follow google news

Surana Jewellers : नाशिकच्या सुराणा ज्वेलर्सवर आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकून बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. या छाप्यात 26 कोटी रोख रक्कम आणि 90 कोटी रूपयांच्या बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून या सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाकडून तपास सुरु होता. या तपासादरम्यान भिंत आणि फर्निचर फोडून आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे.  (income tax raids surana jewellers in nashik seizes 26 crore cash and property worth 90 crore)
 
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या सुराणा ज्वेलर्सवर मालकाने केलेल्या कथित अज्ञात व्यवहाराच्या तपासासाठी मोठा छापा टाकण्यात आला होता. आयकर विभागाने एकाचवेळी ज्वेलर्सच्या दुकानावर आणि मालकाच्या घरावर छापे टाकले होते. यावेळी तीन दिवसांच्या तपासानंतर आयकर विभागाने 26 कोटी रूपये रोख आणि 90 कोटी रूपयाची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : PM Modi : "मी सात वेळा...", मोदींचं पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान

नाशिक, नागपूर, जळगावमधील आयकर विभागाच्या जवळपास 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स आणि महालक्ष्मी रिअल इस्टेटच्या कार्यालयात छापा टाकला होता.यावेळी तब्बल 30 तास ही कारवाई सुरु होती.या कारवाई दरम्यान लपवलेली रोख रक्कम बाहेर काढण्यासाठी मालकांच्या बंगल्यातील फर्निचर आणि भिंत तोडण्यात आले होते. या छाप्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे. 

    follow whatsapp