नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO ने रचला इतिहास, XPoSat मिशन नेमकं काय?

प्रशांत गोमाणे

• 05:11 AM • 01 Jan 2024

एक्सपोसॅट या मिशनची सुरूवात इस्त्रोने 2017 रोजी केली होती. या मिशनचा एकूण खर्च 9.50 कोटी रूपये आहे. XPoSAT उपग्रहाचे एकूण वजन 469 किलो आहे. एक्सपोसॅट प्रक्षेपणाच्या 22 मिनिटानंतर उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाणार आहे.

isro successfully launched space observatory xposat pslv c58 launch

isro successfully launched space observatory xposat pslv c58 launch

follow google news

Isro Xposat Mission Lauch : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने मोठा इतिहास रचला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटमधून आज सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी इस्त्रोने एक्सपोसॅट हा उपग्रह लाँच केला आहे. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे तो पृथ्वीच्या निम्न कक्षेत पाठवण्यात आला आहे. हा उपग्रह आता क्ष किरणांचा डेटा गोळा करेल आणि कृष्णविवर आणि न्युट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे आता चांद्रयान आणि आदित्य एल1 मोहिमेनंतर आता एक्सपोसॅट उपग्रह नेमकं कसे यश मिळवते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (isro successfully launched space observatory xposat pslv c58 launch)

हे वाचलं का?

एक्सपोसॅट या मिशनची सुरूवात इस्त्रोने 2017 रोजी केली होती. या मिशनचा एकूण खर्च 9.50 कोटी रूपये आहे. XPoSAT उपग्रहाचे एकूण वजन 469 किलो आहे. एक्सपोसॅट प्रक्षेपणाच्या 22 मिनिटानंतर उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाणार आहे. या उपग्रहावर दोन पेलोडस बसवण्यात आले आहेत. पोलिक्स (POLIX) आणि XSPECT एक्सपेक्ट अशी या दोन पेलोडसची नावे आहेत. या पेलोडसचे वजन 144 किलोग्राम आहे.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचं जागा वाटप ‘या’ निकषावर ठरणार!

पोलिक्स उपग्रहाचा मुख्य पेलोड

पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे. या पेलोडचे वजन 126 किलो आहे. रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे हे पेलोड तयार केले आहे. पोलिक्स पेलोड हे अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करणार आहे. हे 8-30 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. पोलिक्स अवकाशातील 50 पैकी 40 तेजस्वी वस्तूंचा अभ्यास करणार आहे.

XSPECT काय अभ्यास करणार?

XSPECT म्हणजे एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी. हा 0.8-15 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. हे पोलिक्स श्रेणीपेक्षा कमी ऊर्जा बँडचा अभ्यास करेल. हे पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचा अभ्यास करणार आहे.

हे ही वाचा : Bhima Koregoan : अजित पवारांचा संजय राऊतांवर पलटवार, ‘सोम्या गोम्याच्या…’

कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास

कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, पल्सर विंड नेबूला इत्यादींसारख्या विविध खगोलीय स्त्रोतांमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करणे xposat चे उद्दीष्ट आहे. ते अतिशय जटिल भौतिक प्रक्रिेयेतून तयार होतात आणि त्यांचे उत्सर्जुन समजून घेणे खूप आव्हानात्मक आहे.

    follow whatsapp