3 दिवस पत्नीसोबत, 3 दिवस दुसऱ्या बाईसोबत..पण नंतर घडला धक्कादायक प्रकार, काय आहे लव्ह ट्रँगल?

Viral Love Story : हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एका लव्ह स्टोरीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका घटस्फोटीत महिलेनं तिच्या प्रियकरावर लग्नाचा दबाव टाकून त्याच्याकडून पैसे उकळले आहेत.

Todays Crime Viral News

Todays Crime Viral News

मुंबई तक

• 06:58 PM • 12 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरावर लग्नाचा दबाव टाकून त्याच्याकडून पैसे उकळले

point

मैत्रीचं रुपातंर प्रेमात होऊ लागलं, पण नंतर घडलं...

point

गुंजन आणि तिच्या कुटंबियांनी गुलशनला मारहाण केली

Viral Love Story : हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एका लव्ह स्टोरीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका घटस्फोटीत महिलेनं तिच्या प्रियकरावर लग्नाचा दबाव टाकून त्याच्याकडून पैसे उकळले आहेत. महिलेनं तिच्या प्रियकराला अंमली पदार्थ खायला दिले आणि पत्नी आणि मुलांच्या हत्येचा कट रचला.

हे वाचलं का?

पीडित गुलशन फरिदाबादच्या सारन गावातील रहिवासी आहे. तो मोबाईलचं दुकान चालवतो. याप्रकरणी गुलशनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित गुलशनने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, 2019 मध्ये गुंजन नावाच्या महिलेशी त्याची ओळख झाली होती. गुंजनने गुलशनच्या दुकानात येऊन त्याच्याकडून CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) संबंधीत कामाबाबत माहिती दिली होती. 

जवळीक आणि लग्नाचा दबाव..

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ओळख झाल्यानंतर गुलशन आणि गुंजन यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपातंर प्रेमात होऊ लागलं. परंतु, मागील एक वर्षांपासून गुंजन गुलशनवर लग्नाचा दबाव टाकत होती. गुंजन गुलशनला सांगत होती की, गुलशनने तिच्या मुलांनाही त्याच्यासोबत ठेवावं आणि दोघेही तीन-तीन दिवस एकत्रित राहावे. जर गुलशनने लग्नाला नकार दिला, तर गुंजनने त्याला समाजात अपमानित करण्याचा आणि खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली होती.

हे ही वाचा >> गृहमंत्री अमित शाह रायगडावर आले, औरंगजेबाच्या कबरीबाबत काय म्हणाले?

दरम्यान, गुंजनने गुलशकडून वेगवेगळ्या कारणांसाठी एकूण सात लाख रुपये घेतले होते. या पैशाने गुलशन घर खरेदी करणार होता. जेव्हा गुलशनने गुंजनकडे त्याचे पैसे परत मागितले, तेव्हा गुंजन आणि तिच्या कुटंबियांनी त्याला मारहाण केली. तसच एका रात्री गुंजनने त्याला अंमली पदार्थ खायला देत पत्नी आणि मुलाला जीवे मारण्याचा कट रचला होता, अशी माहिती गुलशनने पोलिसांनी दिलीय. गुलशनने हे प्रकरण पोलिसांत दाखल केलं आहे. परंतु, तो पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत समाधानी नाहीय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> M. Com ते पुण्याचा कुख्यात डॉन.. स्वत:ला 'BOSS' म्हणवून घेणारा निलेश घायवळ आहे तरी कोण?

    follow whatsapp