Optical illusion Test : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो अनेक पद्धतीने व्हायरल होत असतात. परंतु, या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधता शोधता अनेकांना डोकं खाजवावं लागतं. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागतो. अशाच प्रकारचा एक कठीण फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
जर तुम्हाला कठीण फोटोंना पाहून बुद्धीची टेस्ट करायची असेल, तर हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. Minion Quotes नावाच्या एका फेसबुक पेजने असाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत लपलेली तलवार तुम्हाला 5 सेकंदांच्या आत शोधायची आहे.
या फोटोतील चित्रात एक रोमन शैलीतील योद्धा एका भव्य कोलेजियममध्ये उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. या कलाकृतीत एका प्राचिन युद्धक्षेत्राच्या परिस्थितीला दाखवण्यात आलं आहे. पण या फोटोत असलेली तलवार शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. काही लोकांनी या फोटोत लपलेली तलवार दहा सेकंदात शोधल्याचा दावा केला आहे.
हे ही वाचा >> गृहमंत्री अमित शाह रायगडावर आले, औरंगजेबाच्या कबरीबाबत काय म्हणाले?
तर अन्य लोकांचं म्हणणं आहे की, या फोटोतील तलवार शोधण्यासाठी दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ लागला आहे. ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत कमेंट करत एका यूजरने म्हटलंय, जोपर्यंत मी झूम इन केलं नव्हतं, तोपर्यंत मी जवळपास हरलोच होतो. एका अन्य यूजरने म्हटलं, या फोटोला पाहून मी चक्रावूनच गेलो आहे. जर तुम्हाला हे आव्हान पेलायचं असेल, तर या फोटोत लपलेली तलवार पाच सेकंदांच्या आत शोधून दाखवा.
हे ही वाचा >> M. Com ते पुण्याचा कुख्यात डॉन.. स्वत:ला 'BOSS' म्हणवून घेणारा निलेश घायवळ आहे तरी कोण?
ADVERTISEMENT
