Maharashtra Weather Update : पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट! तुमच्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस?

मुंबई तक

06 Jul 2024 (अपडेटेड: 06 Jul 2024, 09:37 AM)

Maharashtra Weather Updates : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मुंबई आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

मुंबई आणि महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

महाराष्ट्र, मुंबई हवामान अंदाज

follow google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभाग अंदाज

point

महाराष्ट्रात पुढील २४ तासांत कसे असेल हवामान?

point

मुंबई हवामान अंदाज

Maharashtra Weather Update: महाराष्ट्राभर मान्सून व्यापला असून, जुलैच्या सुरूवातीपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासांत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे आणि इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Indian meteorological department weather forecast for Maharashtra, Mumbai)

हे वाचलं का?

Maharashtra Weather Alert : या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (६ जुलै) पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होईल. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा >> महाविकास आघाडीची बैठक संपली, बैठकी मागची Inside Story 

दुसरीकडे मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 

7 जुलै रोजी कसे असेल हवामान, कुठे असेल पाऊस?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि उपनगरात हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस असेल. तर ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >> Mazi ladki bahin yojana: झटपट भरा फॉर्म, अर्ज भरण्याची 'ही' आहे शेवटची तारीख! 

हवामान विभागाने कोल्हापूर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 

तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

काही हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शनिवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस पडू शकतो. ही हवामान प्रणाली मजबूत राहिल्यास पुढील आठवड्यात मुंबईत 2-3 दिवसांत सुमारे 200 मिमी पाऊस पडू शकतो.

    follow whatsapp