Maharashtra Weather : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात उसळणार उष्णतेच्या लाटा! कोणत्या जिल्ह्यात धडकणार वादळी वारे?

Maharashtra Weather Today : राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये बदलतं हवामान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची नोंद झाली होती

Maharashtra Weather Today (फोटो - AI)

Maharashtra Weather Today (फोटो - AI)

मुंबई तक

• 07:00 AM • 20 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

point

या राज्यात पसरणार उष्णतेच्या झळा

point

राज्यातील हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये बदलतं हवामान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची नोंद झाली होती. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. पण काही जिल्हे असेही आहेत, जिथे अजूनही कोरड्या हवामानाची स्थिती नोंदवली जात आहे. काल शनिवारी पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, आज 20 एप्रिल 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

हे वाचलं का?

भारतीय हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर,सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरडं हवामान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा >> 'एवढ्या लोकांना धोका देणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?', मनसेच्या 'त्या' नेत्याच्या तिरक्या विधानाचा अर्थ काय?

पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूरमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूरमध्ये वादळ धडकणार असून 30-40 किमी प्रति तास वेगाने वारेही वाहू शकतात. तसच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये हवामान खात्याने कोणताही इशारा दिला नाही. 

तसच शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालनामध्ये कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली होती. मागील दोन दिवसांपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये मान्सूनसदृष्य परिस्थिती दिसत नाहीय. त्यामुळे मराठवाडा, कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दिलासा दिला आहे. 

हे ही वाचा >> Raj-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: 'भांडण मिटवून टाकलं...', उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार!

    follow whatsapp