Viral love Story : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एक महिला तिचा पती आणि तीन मुलांना सोडून भाच्यासोबत फरार झाली आहे. पीडित पतीने पत्नीला परत आणण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, सोनूने रिताला फोनवरून संपर्क केल्यानंतर रिताने त्याला धमकी दिली आणि त्याचा नंबरही ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. सोनू आणि रिताच्या नात्यात दुरावा का निर्माण झाला? याबाबत जाणून घ्या..
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुजफ्फरनगरच्या जानसठ कोतवाली परिसरातील तिसंग गावात राहणाऱ्या सोनूचं लग्न रितासोबत 2013 मध्ये झालं होतं. दोघांनाही तीन मुलं आहेत. परंतु, आतापर्यंत त्यांचं वैवाहिक जीवन सामान्य पद्धतीत सुरु होतं. पण 19 मार्चला रिता अचानक घर सोडून गेली. सोनूने याबाबत म्हटलं की, त्यादिवशी मी आणि रिता शेतात उस काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी रिताचं अचानक डोकं दुखू लागलं. त्यानंतर मी तिला घरी आणलं आणि रिताला उपचारासाठी औषधे दिली. त्यानंतर मी उस काढण्यासाठी शेतात पुन्हा गेलो. त्याचदरम्यान, रिता घरातून गायब झाली.
हे ही वाचा >> Raj-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: 'भांडण मिटवून टाकलं...', उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार!
शोधाशोध केल्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती
रिता गायब झाल्यानंतर सोनूने तिचा शोध सुरु केला. पण अनेक दिवस रिताच थांगपत्ता लागला नाही. परंतु, रिता मेरठ जिल्ह्याच्या मवाना परिसरातील रप्पन गावात भाच्यासोबत राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सोनूने आरोप केला की, रिताचे मोनूसोबत प्रेमसंबंध आहेत. यामुळे ती घर सोडून त्याच्यासोबत फरार झाली. रिता 40 हजार रुपये आणि दागिनेही घेऊन गेली आहे. याप्रकरणी सोनूने पोलिसांत तक्रार दाखल केली.
हे ही वाचा >> जावई नाही आता तोच नवरा... सासूचा लग्नासाठी हट्ट, मुलगा आला समजवायला अनिता म्हणाली, 'येत नाही जा!'
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रिता आणि मोनूला ताब्यात घेतलं. मुजफ्फर पोलिसांनी याप्रकरणाबाबत म्हटलं की, रिता तिच्या सहमतीने मोनूसोबत राहत आहे. पोलिसांनी तिला कुटुंबियांकडे सोपवलं आहे. सोनूच्या नवीन तक्रारीनुसार पोलिसांनी तपसा सुरु केला आहे. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत आणि योग्य ती कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT
