Maharashtra Rain : राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. तर, पाऊस परतीच्या वाटेने निघाला असून काही ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आता हा पावसाचा जोर वाढणार की ओसरणार हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, आजपासून पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबईसह कोकण, मराठवाडा भागात ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसची शक्यता आहे. (maharashtra weather forecast heavy rainfall october heat alert in these districts today 09 october 2024 imd report)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रावर दुहेरी संकट!
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात विचित्र बदल पाहायला मिळत आहेत. आधी जोरदार पाऊस झाला आणि आता ऑक्टोबर हीटचा पारा वाढला आहे. वाढतं तापमान आणि कुठे पावसाचा जोर अशा दोन्ही स्थिती एकाचवेळी निर्माण झाल्या आहेत. या वातावरणीय बदलांमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' व्यक्तींच्या संपत्तीत होईल भरमसाट वाढ! नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणा कुणाचं नशीब चमकणार?
हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा
पावसाला पोषक हवामान असल्याने आज (9 ऑक्टोबर 2024) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी वारे, विजांसह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहील, तर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT