Maharashtra Weather: गरबा खेळायचे होणार वांदे? ऐन नवरात्रीत पुन्हा कोसळणार? वाचा IMD रिपोर्ट

रोहिणी ठोंबरे

04 Oct 2024 (अपडेटेड: 04 Oct 2024, 05:35 PM)

Maharashtra Weather Today : परतीचा प्रवास सुरू असताना राज्यातील वातावरणात बदल होत आहे. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. मात्र आता 5 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

ऐन नवरात्रीत पाऊस कोसळणार?

point

'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा!

point

मुंबईत हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Today : परतीचा प्रवास सुरू असताना राज्यातील वातावरणात बदल होत आहे. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. मात्र आता 5 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. अशातच आता नवरात्रोत्सव सुरू असताना गरबा खेळायचे वांदे होणार का? नवारात्रीत पुन्हा पाऊस कोसळणार का? याचं टेन्शन अनेकांना आलं आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार नवरात्री आणि दिवाळीमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुमच्या शहरात आज पावसाचा अंदाज काय आहे? जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast report IMD Alert mumbai pune Navratri 2024 today 4 october 2024)

हे वाचलं का?

पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला होता. पण आता परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश भागात विश्रांती घेतली आहे. परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाऊस सुरूच आहे. आज (04 ऑक्टोबर 2024) पुन्हा पुणे आणि साताऱ्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तर उर्वरित जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील.

हेही वाचा : Pune Gangrape : संतापजनक! बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर गँगरेप 

'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा!

सध्या मुंबईसह अनेक भागांत नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागत आहे. अशात काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, सातारा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या 9 जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागू शकते. तर शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत हवामानाचा अंदाज काय?

मुंबईत आज (4 ऑक्टोबर) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 27.92 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 28.43 अंश सेल्सियस असेल. यासह शनिवारी आणि रविवारी देखील याठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

    follow whatsapp