Ladki Bahin Yojana: दादांचा वादा! लाडकी बहीण योजनेबबात मोठी घोषणा, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे पैसे...

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

03 Oct 2024 (अपडेटेड: 03 Oct 2024, 12:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबबात मोठी घोषणा

point

'या' तारखेला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे खात्यात होणार जमा

point

अजितदादांचा वादा असं म्हणत ही मोठी घोषणा

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500, तर अनेकांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले आहेत. अशातच, आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. (majhi ladki bahin yojana the money of october and november installment will be deposited in womans accounts on this date big annoucement)

हे वाचलं का?

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे 4500 मिळाले आहेत. तर, सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत. 

हेही वाचा : पुण्यात टोळक्यांचा थरार! IT इंजिनिअरच्या कुटुंबाचा 40 जणांकडून जीवघेणा पाठलाग, CCTV मध्ये कैद

दादांचा वादा! लाडकी बहीण योजनेबबात मोठी घोषणा

अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन महिन्यांचे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दिवाळीच्या आधीच भाऊबीज ओवाळणी म्हणून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. दादांनी बीड येथील एका सभेत ही मोठी घोषणा केली. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. 

महत्त्वाचे म्हणजे या जाहीर सभेत बोलताना अजितदादांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे कोणत्या तारखेला मिळणार हे देखील जाहीर केले आहे.

हेही वाचा : Dyaneshwar Patil Death: ठाकरे गटाचा कट्टर शिवसैनिक हरपला! माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

अजितदादा यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात असे संकेत दिलेत. 10 ऑक्टोबरला आगामी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करू हा अजितदादांचा वादा आहे, असे म्हणत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

    follow whatsapp