Dyaneshwar Patil Death: ठाकरे गटाचा कट्टर शिवसैनिक हरपला! माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

धाराशिव : भूम परांडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:40 AM • 03 Oct 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

point

ज्ञानेश्वर पाटील यांचा राजकीय प्रवास 

point

एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जायचे

धाराशिव : भूम परांडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लंग्ज इन्फेक्शन झाल्यामुळे माजी आमदार पाटील यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले होते. पण काल (02 ऑक्टोबर 2024) रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज गुरुवार 03 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (bhum paranda vashi former mla shivsena ubt dnyaneshwar patil passed away dharashiv news)

हे वाचलं का?

ज्ञानेश्वर पाटील यांचा राजकीय प्रवास 

सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सुरुवातीच्या काळात ड्रायव्हर म्हणून काम करणारे पाटील पुढे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात उतरले आणि 1995 आणि 1999 अशा दोन वेळेस ते भूम परंडा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले होते.

हेही वाचा: पुण्यात टोळक्यांचा थरार! IT इंजिनिअरच्या कुटुंबाचा 40 जणांकडून जीवघेणा पाठलाग, CCTV मध्ये कैद

एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता.

धाराशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी आमदार असतानाही आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यामुळे या परिसरात पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

मागील काही दिवसांपासून आजारी असूनही पाटील यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. अशात आता पाटील यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

    follow whatsapp