Diwali Laxmipujan Date: देशभरात दिवाळीच्या उत्सवाचा धुमधडाका सुरु आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत दिवाळीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व असतं. दिवाळीचा सण अमावस्याच्या रात्री साजरा केला जातो. अशातच अनेक जणांचा दिवाळीच्या तारखेबाबत गोंधळ उडालेला. काहींना वाटलं की दिवाळी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाईल, तर काही जण 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्याचा प्लॅन करत आहेत.
ADVERTISEMENT
कधी आहे यंदाची दिवाळी?
Diwali 2024 Date:दिवाळीचा उत्सव साजरा करण्याबाबत लोक अजूनही गोंधळात पडले आहेत. हिंदू शास्त्रानुसार, दिवाळीचा उत्सव अमावस्येचा रात्री साजरा केला जातो. श्री राम प्रभुने रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येला दिव्यांनी सजवलं होतं आणि भगवान श्री राम प्रभुचं भव्य स्वागत केलं होतं. त्या दिवशी कार्तिक महिन्याची अमावस्या तिथी होती. त्यानंतर दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरु झाली.
हेही वाचा : Gold Smuggling in Private Part : प्रायव्हेट पार्टमधून तस्करी, एक्स-रेमधून समोेर आला भलताच प्रकार, सोन्याचे तब्बल...
लक्ष्मीपूजनाचा शुभमहूर्त कोणता आहे?
Laxmi Puja Shubh Date:दिवाळीच्या सायंकाळी माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने घरात माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्ती वाढते. घरात सुख-समृद्धी येते. 31 ऑक्टोबरला सायंकाळी 6.27 मिनिटांपासून रात्री 8.32 मिनिटांपर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त होता. तसच दिवाळी पूजेचा निशिता मुहूर्त रात्री 11.39 मिनिटांपासून उशिरा रात्री 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे.
पंचांगानुसार कार्तिक महिन्याची अमावस्या 1 नोव्हेंबरपर्यंत असली तरी दिवाळी 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली गेली. अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:12 वाजता सुरू झाली असून 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05:14 वाजता समाप्त होईल, त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल.
ADVERTISEMENT