11th November 2024 Gold Rate : सोन्याचे दर वाढले की घसरले? एका क्लिकवर वाचा 1 तोळ्याचे भाव...

रोहिणी ठोंबरे

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 12:36 PM)

Gold Prices in Mumbai Today 11 Nov 2024 : भारतात सोन्याला किती पसंती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण गेल्या काही दिवसांपासून दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

स्त्रियांमध्ये सोन्याची प्रचंड लोकप्रियता

point

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात.

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold Prices in Mumbai Today 11 Nov 2024 : भारतात सोन्याला किती पसंती आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. विशेषतः स्त्रियांमध्ये सोन्याची खूप लोकप्रियता आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. काही दिवसात लग्न साराईलाही सुरुवात होईल. अशावेळी सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय. चला तर मग आजचे (11 नोव्हेंबर 2024) सोने-चांदीचे भाव सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices today 11 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold mumbai pune nashik nagpur

हे वाचलं का?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.ॉ

हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : राज्यात महायुती पुन्हा बाजी मारणार? मविआला किती जागा मिळणार? : IANS सर्व्हे

Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (10 नोव्हेंबर 2024) 24 carat 10 gm (1 तोळा) सोन्याचा भाव 79,360 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 600 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 78,760 रूपये झाली आहे. तर, 22 carat सोन्याचा भाव 72,750 रूपये होता. त्यातही 550 रूपयांनी घट झाली असून त्याची किंमत 72,200 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 93,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Horoscope In Marathi: मिथुन राशीच्या लोकांवर कोसळेल आर्थिक संकट! 'या' राशी होतील मालामाल, तुमचं भविष्य काय?

देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 carat सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold Rate 22, 24, 18 carat in Mumbai

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,200 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,760 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,070 रूपये आहे.

Gold Rate 22, 24, 18 carat in Pune

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,200 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,760 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,070 रूपये आहे.

Gold Price 22, 24, 18 carat in Nagpur

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,200 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,760 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,070 रूपये आहे.

10gm 22, 24, 18 carat in Nashik

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,230 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,790 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,100 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 carat सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 carat सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

 

    follow whatsapp