Maharashtra Weather Update 18 Nov 2024 : महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल (Climate change) होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यादरम्यान, आजपासून राज्यातील वातावरण निवळणार असून, हळूहळू पहाटेच्या किमान तापमानाचा पारा घसरुन सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीला सुरूवात होणार आहे. चला तर मग आजचा (18 नोव्हेंबर 2024) हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. (maharashtra weather forecast update Today 18 november 2024 winter season minimum temperature IMD report mumbai pune kolhapur nagpur)
ADVERTISEMENT
राज्यातील कोणत्या भागात थंडीचा पारा वाढणार?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः विदर्भात चांगली थंडी पडण्याची शक्यता आहे. अर्थात सध्या लगेचच थंडीच्या लाटेची अपेक्षा नसल्याची माहिती आहे. अशावेळी मुंबईत काही दिवस सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत होता. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तोदेखील नाहीसा झाला आहे.
हेही वाचा : Mumbai Weather : हवेची गुणवत्ता किती ढासळली? मुंबईत कसं आहे सध्या वातावरण?
मराठवाड्यासह, विर्दभात थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात थंडीचा पारा वाढणार आहे. नाशिक, छत्रपती संभाजी नगर बीड, नांदेड, हिंगोली, परभणी अशा एकूण 22 जिल्ह्यात थंडीची लाट पसरणार आहे. यावेळी किमान तापमानसह कमाल तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे.
मुंबईत हवामानाचा अंदाज काय?
मुंबई आणि कोकणात किमान आणि कमाल तापमानात कोणतीही घट दिसत नाहीये. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा सध्या मुंबईकर उन, पाऊस आणि थंडी असा एकत्रीत वातावरणाचा अनुभव घेत आहेत. नोव्हेंबर महिन्याचे अगदी आता काही दिवस उरलेले असताना सुद्धा मुंबईकर अजूनही थंडीच्या प्रतीक्षेतच आहेत.
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सिअस आणि 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रता पातळी 47 टक्के असेल.
ADVERTISEMENT