Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईकरांसाठी पुढील 24 तास महत्वाचे...

रोहिणी ठोंबरे

22 Aug 2024 (अपडेटेड: 22 Aug 2024, 06:13 PM)

Maharashtra Weather News Update : हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

point

मुंबई शहरातील आजचे हवामान

point

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती काय?

Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यादरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (maharashtra Weather news 22 august 2024 IMD report of Mumbai pune and these districts)

हे वाचलं का?

मुंबई शहरातील आजचे हवामान

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस/माघेगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल.

हेही वाचा: बदलापूर अत्याचार: डोक्यात तिडीक जाणाऱ्या शाळेच्या 'त्या' चुका!

'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती काय?

कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

    follow whatsapp