Maratha Reservation : जरांगेंनी सरकारचा आदेश धुडकावला, भगवं वादळ मुंबईच्या दिशेने

प्रशांत गोमाणे

25 Jan 2024 (अपडेटेड: 25 Jan 2024, 10:17 AM)

मुंबईच्या दिशेने जातो, ते शिष्टमंडळ आल्यावर चर्चा करू, असे जरांगेंनी सांगितले. तसेच आझाद मैदानात आमचे स्टेज तयार आहेत. आम्ही परवानगी घेतल्याचेही जरांगेंनी यावेळी सांगितले.

manoj jarange continue rally mumbai maratha reservation shinde goverment delegation meet

manoj jarange continue rally mumbai maratha reservation shinde goverment delegation meet

follow google news

Manoj Jarange Mumbai rally, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा आदेश धुडकावत मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची ठाम भूमिका मांडली आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच जरांगेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. (manoj jarange continue rally mumbai maratha reservation shinde goverment delegation meet)

हे वाचलं का?

लोणावळ्यात सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगेंची बैठक पार पडली होती. या बैठकीत मनोज जरांगेंची मनधरणी करण्यास सरकारला अपयश आले आहे. शिष्टमंडळाच्या चर्चेत कोणताच तोडगा निघाला नसल्याने त्यांनी मी मुंबईच्या दिशेने जात असल्याचे  सांगितले. या बैठकीनंतर जरांगेंनी बैठकीतला तपशील माध्यमांना सांगितला.

आम्हाला मार्ग काढायचं, तोडगा काढायचंय…पण आम्हाला आंदोलनही करायचं, मराठा समाजाला न्याय द्यायचंय..हेही तितकेच खरे आहे. म्हणून आम्ही लोणावळ्यात थांबल्याचे जरांगेंनी यावेळी सांगितले. तसेच या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. आम्ही जो मुद्दा त्यांना पर्वा सांगितला, 8 दिवसापूर्वी सांगितला, दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय घेऊन ते आले होते. त्याच दुरूस्त्या होत्या, असे देखील जरांगेंनी सांगितले.

आता या बैठकीनंतर त्यांच आणखीण एक मोठ शिष्टमंडळ य़ेणार आहे. हे शिष्टमंडळ परिपत्रक, शासन निर्णय आणि आदेश घेऊन येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे जरांगे सांगतात. यावर जरांगेनी त्यांनाच येऊ द्या, तिथपर्यंत आम्ही मुंबईत जातो,अशी त्यांनी भूमिका घेतली. मी नाही थांबू शकत, मला जात महत्वाची आहे. त्यांचे शिष्टमंडळ जिकडे येईल तिकडे आम्ही थांबू. आणि आम्ही मजा करायला आलो नाही, लोक थंडीत झोपतायत,जितके मुंबईकरांचे हाल आहेत तितके आमचेही होतायत, असे देखील जरांगेंनी स्पष्टच सांगितले.

महायुती सरकारला विनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष येऊन भेटाव आणि या प्रकरणात लक्ष घालाव, चर्चा करावी आणि तोडगा काढावा, अशी शेवटची विनंती मराठा समाजाच्या वतीने करत असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले.

54 लाखांच्या नोंदीबाबत, सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत दुसर शिष्टमंडळ आदेश काढून परिपत्रक काढून घेऊन येत आहेत. मग मी म्हटलं मुंबईच्या दिशेने जातो, ते शिष्टमंडळ आल्यावर चर्चा करू, असे जरांगेंनी सांगितले. तसेच आझाद मैदानात आमचे स्टेज तयार आहेत. आम्ही परवानगी घेतल्याचेही जरांगेंनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp