Today Gold Rate: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल शनिवारी घोषित करण्यात आला. यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला बाजी मारता आली नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीत सोन्याच्या भावही गगनाला भिडले आहेत. मुंबईत शनिवारी 24 कॅरेटच्या सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 870 रुपयांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकालाचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे. उद्या सोमवारी या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत सोन्याची किंमत
मुंबईत सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78857 रुपये आहे. एक दिवस आधी सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 77657 रुपये होती. मुंबईत आज चांदीची किंमत 94300 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. एक दिवस आधी चांदीची किंमत 94500 प्रति किलोग्रॅम होती. तर मागील आठवड्यात चांदीची किंमत 91900 रुपये प्रति किलोग्रॅम होती.
हे ही वाचा >> Elon Musk : एका दिवसात 64 कोटींची मतमोजणी! ट्वीट तुफान व्हायरल; एलॉन मस्क म्हणाले, "भारतीय निवडणूक..."
दिल्लीत सोन्याची किंमत
दिल्लीत आज सोन्याच्या 10 ग्रॅमचे दर 79003 रुपये आहे. एक दिवस आधी सोन्याचे दर 77803 रुपये होते. मागील आठवड्यात सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 75823 रूपये होता. दिल्लीत आज चांदीचा भाव 95000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. एक दिवस आधी चांदीचे दर 95200 रुपये प्रति किलोग्रॅम होते. मागील आठवड्यात चांदीचा भाव 92600 रुपये प्रति किलोग्रॅम होते.
चेन्नईत सोन्याचे भाव
चेन्नईत आज सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचा भाव 78851 रुपये आहेत. एक दिवस आधी सोन्याच्या 10 ग्रॅंमचे दर 77651 रुपये होते. मागील आठवड्यात सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 75671 रुपये होती.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिंदेंचे 57 शिलेदार जिंकले, किती जागांवर ठाकरेंच्या उमेदवारांना पाडलं?
चेन्नईत चांदीचा भाव
चेन्नईत आज चांदीची किंमत 103600 रुपये प्रति किलोग्रॅम होती. एक दिवस आधी चांदीची किंमत 103600 प्रति किलोग्रॅम होती. तर मागील आठवड्यात चांदीची प्रति किलोग्रॅमची किंमत 101700 इतकी होती. सोन्याची किंमतीत प्रत्येक दिवशी बदल होतात. जगातील आर्थिक स्थिती, मोठ्या देशांतील तणाव, सोन्याची मागणी आणि सप्लाय, अशा कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत उलाढाल होते. भारतात सोन्याची किंमत फक्त आंतरराष्ट्रीय बाजारामुळेच निश्चित होत नाही, तर यामध्ये आयात शुल्क, टॅक्स आणि रुपये-डॉलरचाही परिणाम होतो.
ADVERTISEMENT