कल्याण: कल्याणमधील आधारवाडी परिसरात असलेल्या हायप्रोफाईल व्हेर्टेक्स सोसायटीच्या १५ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भीषण आग लागली, या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले. आगीमुळे पंधराव्या, चौदाव्या आणि सोळाव्या मजल्यावरील तीन ते चार फ्लॅट जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे अग्निशमन दल 13 ते 15 गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, इमारतीची उंची जास्त असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात अनेक अडथळे येत होते.
ADVERTISEMENT
कल्याणमधील व्हर्टेक्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स ही हायप्रोफाईल सोसायटी म्हणून ओळखली जाते, मंगळवारी संध्याकाळी या कॉम्प्लेक्सच्या 15 व्या मजल्यावर असलेल्या एका घरात अचानक आग लागली. यानंतर पंधराव्या मजल्यावर लागलेली आग चौदाव्या मजल्यावर आणि सोळाव्या मजल्यावर पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणे वापरून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आग विझवत असताना एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
हे ही वाचा>> Viral Video: घोड्यावर बसलेल्या नवऱ्याला लुटलं! नवरा पळाला अन् जेम्स बॉण्ड स्टाईलने चोरट्याला धू-धू-धुतलं!
त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती, रहिवासी लिफ्ट आणि पायऱ्यांच्या मदतीने खाली उतरताना दिसत होते. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पोलीस प्रशासनाने लोकांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवले.
नेमकं काय घडलं?
◆ KDMC च्या अग्निशमन दलासह ठाणे महानगरपालिका, बदलापूर नगरपालिकेच्या आधुनिक अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या. या आगीत जीवित वा वित्तहानी झाली आहे की नाही किंवा कोणी अडकले आहे का, हे पाहण्यासाठी महापालिका आणि पोलिसांकडून ड्रोनचा वापर करण्यात आला.
हे ही वाचा>> Viral Video: फक्त टॉवेल लावून भर रस्त्यात थिरकली प्रसिद्ध मॉडेल! लोकांनी बघताच...
◆ कल्याण महानगरपालिकेचे अग्निशमन दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्यानंतरही वरपर्यंत पोहोचण्यासाठी असलेली शिडी बंद असल्याने आग विझवण्यास विलंब होत असल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशांनी केला आहे. अग्निशमन विभागाच्या लोकांनी इमारतीत चढून इमारतीच्या अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने आग विझवली. यावेळी त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याचीही मदत घेतली. दरम्यान, आग वाढत असल्याचे पाहून पोलीस ठाण्याचे अग्निशमन दलाचे 50 मीटर उंच शिडीचे मशिन घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
◆ आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून, अधिक आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव घटनास्थळी उपस्थित होते. आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नसली तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन विभागाने व्यक्त केली आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
ADVERTISEMENT