Manoj Jarange News : गौरव साळी, जालना : ''मी तुमच्यासाठी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीही अपेक्षा नाही. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव हातावर घेतला आहे. मी शेवटच्या घटकापर्यंत मराठा समाजाला कधीही सोडणार नाही'', असं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना अश्रू अनावर झाले होते. (manoj jarange patil is in tears on maratha reservation obc reservation maharashtra politics)
ADVERTISEMENT
मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देहदान करण्याचा निर्णय घेतलाय. जसं मी माझं आयुष्य समाजासाठी अर्पण केलय, तसचं माझा देह पण मी मेल्यावर दान करा अशी मनोज जरांगे यांनी व्यक्त केलीय. फक्त माझे तळ हात आणि पाय माझ्या कुटुंबाला देण्यात यावेत अस जरांगे म्हणालेत. मेल्याच्या नंतर आपण शरीर जाळून टाकल्या पेक्षा देहदान करावं असं आवाहन देखील जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.
हे ही वाचा : Mukhyamantri Vayoshri Yojana : जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये, वाचा 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'ची A टू Z माहिती
सरकारने, विरोधी पक्षाने जरी वेदना दिल्या, तर मी त्या वेदना सहन करण्याचं ठरवून घेतलय अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. समाजाने माझ्यावर विश्वास टाकलाय, मी समाजाला दुखावणार नाही असं म्हणत माझ्यावर किती जरी मोठा हल्ला झाला, मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो असलो तरी माझ्या तोंडात फक्त आणि फक्त मराठा हेच नाव येणार असं जरांगे म्हणालेत.
मराठा समाजाने आता गावागावात बैठका सुरू करा, आपलं जे काही ठरेल ते आपण 29 ऑगस्ट रोजी जाहीर करू असं जरांगे म्हणालेत. माझं आणि सरकारचं वैर नाही, मी मराठ्याचे पोर मोठे व्हावेत म्हणून सरकार सोबत वैर पत्कारले असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. सरकारला माहिती आहे, मी किती कणखर आहे, मी जे बोलतो ते करतो, गरीब मराठे, मुस्लिम, दलीत, धनगर, माळी यांना मी आजी मुख्यमंत्री करणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जालन्यातील जामवाडी येथे त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या बॅनर वर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
हे ही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांना कुठल्याही क्षणी अटक होणार? अटकपूर्व जामीन फेटाळला
दरम्यान अटक वॉरंट जारी झाल्यानंतर न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज जरांगे पुण्याला रवाना झालेत. प्रकृती बरोबर नसल्याने मनोज जरांगे पाटील रुग्णवाहिकेतून पुण्याकडे निघाले आहेत. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. त्यांनतर न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलय. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी जरांगे पाटील जालन्यातल्या अंतरवाली सराटीतून रुग्णवाहिकेत बसून पुण्याला रवाना झालेत. आपण न्यालयाचा सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दौऱ्याला निघण्यापूर्वी दिली आहे.
ADVERTISEMENT