Mumbai Crime Latest News : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची महिला पायलट सृष्टी तुलीचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाला. सृष्टीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं शव विच्छेदन अहवालातून समोर आलंय. सृष्टीने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तिच्या प्रियकराने पोलीस तपासादरम्यान सांगितलं, अशी माहिती मृताच्या नातेवाईकांनी दिली. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंबईच्या पवई पोलिसांनी आरोपी आदित्य पंडितला अटक केलीय. परंतु, सृष्टीची हत्या झाल्याचा संशय नातवाईकांना आहे. सृष्टीच्या मानसिक छळ केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी प्रियकरावर केला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, सृष्टीच्या तुलीच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सृष्टीचा प्रियकर आदित्य पंडितने घटनेच्या रात्री त्याच्या दुसऱ्या प्रेयसीला फ्लॅटवर बोलावून गेट खुलं केलं होतं. फ्लॅटची तिसरी चावी सापडलेली नाहीय. सृष्टी आदित्यच्या जाचाला कंटाळली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलीय.
हे ही वाचा >> Nana Patole :"जनतेची मतं चोरण्याचा आणि डाका टाकण्याचं काम...", नाना पटोलेंनी सांगितली A to Z स्टोरी
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या आझाद चौकात शिवपुरी कॉलनीत राहणारी सृष्टी एयर इंडियात पायलट होती. ती मुंबईच्या अंधेरी परिसरात राहत होती. रविवारी ड्युटी संपल्यानंतर साडेबारा वाजता सृष्टी तिच्या फ्लॅटवर पोहोचली होती. त्यानंतर आदित्य पंडित नावाच्या तरुणासोबत तिने जेवण केलं. घरी पोहोचल्यानंतर तिने गोरखपूरला राहणाऱ्या तिच्या आईशी संपर्क साधला. सृष्टीने 2023 मध्ये एयर इंडिया कंपनी जॉईन केली होती.
हे ही वाचा >> Jiah Khan Case: "जिया खानने चार-पाचवेळा आत्महत्या...", सूरज पांचोलीच्या आईने केला धक्कादायक खुलासा
आदित्य दिल्लीला घरी जाण्यासाठी सृष्टीच्या फ्लॅटमधून रात्री दीड वाजता निघाला होता. त्यानंतर रात्री 2 वाजता सृष्टीने त्याला कॉल केला आणि ती आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं. तोपर्यंत तो मुंबईहून ३५ किमी दूरवर पोहोचला होता. त्यानंतर तो परत आला आणि त्याने दुसऱ्या प्रेयसीला बोलावून सोमावारी सकाळी पाच वाजता दुसरी चावीने टाळा उघडला. त्यानंतर त्याने पाहिलं की, सृष्टीने चार्जिंग केबलने गळफास घेतला. त्याने सृष्टीला खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
ADVERTISEMENT