NEET Latur : 'नीट पेपर'फुटीचे लातूरपर्यंत कनेक्शन, दोन शिक्षकांना ATS ने घेतले ताब्यात

मुंबई तक

23 Jun 2024 (अपडेटेड: 23 Jun 2024, 12:28 PM)

Neet paper leak accused : नीट पेपर फुटी (Neet paper leak) प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. लातूर जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषद शिक्षकांना ATS ने अटक केली आहे.

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी लातूरमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लातूरमधील दोन शिक्षकांना नांदेड एटीएसने ताब्यात घेतले आहे.

follow google news

Neet paper leak Maharashtra : (कुवरचंद मंडले, नांदेड) नीट परीक्षा पेपर फुटीचे पडसाद देशभरात उमटले आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा पुढे ढकलली आहे. दुसरीकडे  पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, याचे धागेदोर महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले आहेत. लातूरमधील दोन जिल्हा परिषद शिक्षकांना एटीएसने ताब्यात घेतले असून, मोठी खळबळ उडाली आहे. (ATS has detained two ZP teachers from Latur in the NEET paper leak case)

हे वाचलं का?

नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून, आता या प्रकरणात लातूरमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

जिल्हा परिषद शिक्षक सहभागी असल्याचा संशय

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात या दोन शिक्षकांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. शनिवारी (२२ जून) रात्री नांदेड एटीएसच्या पथकाने अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेज समोर असलेल्या जिजाऊ कॉलनीतून एकाला अटक केली.

हेही वाचा >> मोदींनी सांगितल्याप्रमाणेच क्रांतिकारी गोष्टी घडल्या -जयंत पाटील 

संजय तुकाराम जाधव (वय 45) असे ताब्यात घेतलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथील रहिवासी असून, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावातील जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

हेही वाचा >> आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा जागी मृत्यू 

एटीएसने ताब्यात घेतलेल्या दुसऱ्या शिक्षकाचे नाव जलील उमरखा पठाण (वय 42) असे आहे. लातूर तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नांदेड एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, याबद्दल माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. 

नीट पीजी परीक्षा पुढ ढकलली

नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 23 जून 2024 रोजी म्हणजे रविवारी ही परीक्षा होणार होती, पण नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

    follow whatsapp