UGC Net Exam : संशोधक विद्यार्थ्यांना झटका! नेट परीक्षा का करण्यात आली रद्द?

मुंबई तक

20 Jun 2024 (अपडेटेड: 20 Jun 2024, 08:59 AM)

NET exam cancelled : यूजीसी नेट २०२४ परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रद्द का केली? काय आहे प्रकरण वाचा...

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेट परीक्षा 2024 रद्द का झाली?

point

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती

point

सीबीआय करणार तपास

UGC NET Latest News : 'नीट' परीक्षेवरून घमासान सुरू असतानाच 19 जून रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा रद्द केली. नेट परीक्षा रद्द करण्याच्या कारणाचाही खुलासा करण्यात आला असून, आता शिक्षण मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.  परीक्षा एजन्सी एनटीएद्वारे 18 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. (Why is the NET exam cancelled)

हे वाचलं का?

मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा 'नीट'वरून गोंधळ सुरू असतानाच आणखी एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली. 

'एनटीए'कडून 18 जून रोजी यूजीसी नेट परीक्षा घेतली होती. 11 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर 9 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एका दिवसानंतरच परीक्षा रद्द करण्यात आली. 

नेट परीक्षा रद्द का करण्यात आली?

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. "19 जून 2024 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटरच्या सायबर क्राइम शाखेकडून या परीक्षेबद्दल काही माहिती मिळाली होती. त्या माहितीतून प्राथमिक अंदाजानुसार संकेत मिळाले की, या परीक्षेत गडबड करण्यात आली आहे."

हेही वाचा >> शिंदेंचे 17 आमदार 'डेंजर झोन'मध्ये, विधानसभा जिंकणं कठीण?

शिक्षण मंत्रालयाने पुढे असेही म्हटले आहे की, "या परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि पवित्रता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की, यूजीसी नेट जून 2024 परीक्षा रद्द करण्यात यावी."

हेही वाचा >> '...तर उद्धव ठाकरेंचा फायदा होईल..', प्रकाश आंबेडकरांचं प्रचंड मोठं विधान!

"नव्याने परीक्षा घेतली जाईल. त्यासंदर्भातील माहिती दिली जाईल. त्याचबरोबर याचा तपास करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे", असेही शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. 

नेट परीक्षा महत्त्वाची का?

यूजीसी नेट परीक्षा देशभरातली विद्यापीठांमध्ये पीएच.डी. प्रवेश, कनिष्ठ संशोधन शिष्यवृती म्हणजे जेआरएफ आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. यूजीसी नेट पऱीक्षेत दोन पेपर असते. त्यात पर्याय प्रश्न असतात. पहिला पेपर 50 प्रश्नांचा असतो. दुसरा पेपर 100 प्रश्नांचा असतो. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात. दोन्ही पेपर सोडवण्यासाठी परीक्षार्थींना तीन तासांचा वेळ दिला जातो. पहिला पेपर अनिवार्य असतो.

    follow whatsapp