Manoj Jarange : ''फडणवीस साहेब तो डाव टाकू नका...'', जरांगे स्पष्टच बोलले

मुंबई तक

22 Jun 2024 (अपडेटेड: 22 Jun 2024, 08:21 PM)

Manoj Jarange News : नरेटिव्ह भरून काढायच्या नादात मराठ्यांचा अपमान कराल, फडणवीस साहेब नरेटिव्ह पसरवला, नरेटिव्ह पसरवला तो भरून काढायचाय. तुम्ही जर त्यांना अंधारातून पाठबळ देणार असाल आणि आमच्या अंगावर त्यांना घालत असाल आणि ओबीसीच मोट बांधत असाल, तर जरांगे आणि मराठा समाज यशस्वी होऊ देणार नाही, असे जरांगेंनी स्पष्ट सांगितले.

manoj jarange patil warn eknath shinde devendra fadnavis on maratha reservation laxman hake obc reservation

मराठ्यांशिवाय राज्यात पान हळू देणार नाही

follow google news

Manoj Jarange On Devendra Fadnavis : तुम्ही जर त्यांना अंधारातून पाठबळ देणार असाल, आमच्या अंगावर घालणार असाल आणि ओबीसींची मोट बांधत असाल, तर मुख्यमंत्र्यांना आणि फडणवीसांना मी जाहीर सांगतो. ओबीसींची मोट बांधायच्या भानगडीत पडू नका, जरांगे हे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठ्यांशिवाय राज्यात पान हळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) दिला आहे. (manoj jarange patil warn eknath shinde devendra fadnavis on maratha reservation laxman hake obc reservation)
 
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, आम्ही उपोषणाला बसल्यावर जातीय तेढ निर्माण झाला, आता त्यांचे बसल्यावर तेढ नाही का निर्माण झाला? ते बसल्यावर नाही का गर्दी झाल? हे काम भुजबळ करणारा आहे. हा छगन भुजबळ म्हणतो ही माझी लोकं आहेत ती, मी बसवली आहेत,असे जरांगे म्हणाले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ''एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द केले तर...'', जरांगेंचा महायुती सरकारला इशारा

मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीसांना मी जाहीर सांगतो. ओबीसींची मोठं बांधायच्या भानगडीत पडू नका.  ओबीसीची मोठं बांधून अमकं होईल आणि तमकं होईल आणि पाठबळ द्याल आणि मराठ्यांवर अन्याय कराल. तर मी तुम्हाला जाहीर सांगतो, मराठ्यांशिवाय राज्यात पान हळू देणार नाही, असे जरांगेंनी ठणकावून सांगितले आहे. 

नरेटिव्ह भरून काढायच्या नादात मराठ्यांचा अपमान कराल, फडणवीस साहेब नरेटिव्ह पसरवला, नरेटिव्ह पसरवला तो भरून काढायचाय. तुम्ही जर त्यांना अंधारातून पाठबळ देणार असाल आणि आमच्या अंगावर त्यांना घालत असाल आणि ओबीसीच मोट बांधत असाल, तर जरांगे आणि मराठा समाज यशस्वी होऊ देणार नाही, असे जरांगेंनी स्पष्ट सांगितले. 
 
 मराठ्यांवर जर 13 तारखेपर्यंत अन्याय झाला. मग तुमच्या पक्षातले मराठे नेते ही हे सहन करणार नाही.कारण भाजपमधल्या मराठा नेत्यांची जात वाचवण्याचीही जबाबदारी आहे. जर तुमच्या पक्षातले मराठे नेते हा अन्याय बघून सहन करून तुमच्यामागे राहिले तर, त्यांचा मागे एकही मराठा राहणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : ''औकातीत राहा बेट्या हो...'', भुजबळांची जरांगे पाटलांवर बोचरी टीका

फडणवीस साहेब तो डाव टाकू नका. मी हात जोडून सांगतो. ओबीसीची मोट बांधण्याच्या नादात, तुम्ही पाठबळ देताय. पण जातीय तेढ निर्माण होईल म्हणून आमच्या आंदोलनाची परवानगी नाकारली. मग जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्यांना परवानगी दिलीत का? ओबीसींचं आंदोलन छगन भुजबळांनी कसं उभं कसं? मग नाही का जातीय तेढ निर्माण झाला? जातीयवाद आणि भांडणे झाली, कोणत्या दिशेने फडणवीस साहेब राज्य चाललंय? असा सवाल जरांगेंनी केला.

    follow whatsapp