Balasaheb Thackeray and Narendra Modi : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आदरांजली अर्पण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. (PM Modi pays Tribute to Balasaheb Thackeray on his Birth Anniversary)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, “बाळासाहेब ठाकरेजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते, ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर प्रभाव अतुलनीय आहे.
हेही वाचा >> ‘शिवाजी राजांना संन्यास घ्यायचा होता..’, PM मोदींसमोर ‘त्या’ महाराजांचं वक्तव्य
पुढे मोदी म्हणाले, “त्यांचे नेतृत्व, आदर्शांप्रती अथक समर्पण, गरीब- दलितांसाठी आवाज उठवण्याची वचनबद्धता यामुळे असंख्य लोकांच्या मनात त्यांचं स्थान आहे”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.
शिवसेनेची मोदी-शाहांवर टीका
पंतप्रधान मोदींनी अभिवादन करण्यापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या जयंतीदिनी लिहिलेल्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. “शिवसेनाप्रमुख या पदातील शिवसेना मोदी-शाहांच्या भारतीय जनता पक्षाने सध्या महाराष्ट्रद्रोही गुलामांच्या हाती सोपवली आहे. सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही”, असे बोल ठाकरेंनी सुनावले आहेत.
हेही वाचा >> “बाळासाहेबांनी जंगलराज पेटवले असते”, मोदी-शाहांना ठाकरेंचे सवाल
त्याचबरोबर “शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची निर्मिती बाळासाहेब ठाकरे यांनी केली. पण महाराष्ट्राची लूट विनासायास करता यावी यासाठी बाळासाहेबांची शिवसेना ‘गुजरात लॉबी’ने फोडली, पण शिवसेना संपली काय? ती महाराष्ट्राच्या कणाकणांत आहे, मनामनात आहे”, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT