Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) पूजा खेडकर यांना मोठा दणका दिला आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. (pooja khedkar big blow pre-arrest bail has been rejected patiala house court training ias officert)
ADVERTISEMENT
युपीएससीने कारवाई करत पूजा खेडकर यांचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला कोणत्याही परीक्षेत बसण्यास मनाई केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे.
पूजा खेडकर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांसंदर्भात दिल्लीच्या पटियाला कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र पटियाला कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलीस कोणत्याही क्षणी पूजा खेडकर यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचा अर्ज थेट होणार रद्द? पटकन तपासा तुमचा अर्ज!
पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी आयएएस नियुक्ती रद्द
यूपीएससीने म्हटले आहे की, पूजा खेडकरचे मागील सर्व रेकॉर्ड तपासले. प्रशासकीय सेवा परीक्षा 2022 नियमानुसार ती दोषी असल्याचे आढळून आले आहे. तिची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. त्याचबरोबर यूपीएससीच्या सर्व परीक्षा देण्यावर, निवडीवर कायमची बंदी घालण्यात येत आहे.
यूपीएससीने म्हटले आहे की, पूजा खेडकरचे मागील सर्व रेकॉर्ड तपासले. प्रशासकीय सेवा परीक्षा 2022 नियमानुसार ती दोषी असल्याचे आढळून आले आहे. तिची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. त्याचबरोबर यूपीएससीच्या सर्व परीक्षा देण्यावर, निवडीवर कायमची बंदी घालण्यात येत आहे.
पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे यूपीएससीने गेल्या 15 वर्षातील म्हणजे 2009 ते 2023 पर्यंतचे सर्व रेकॉर्ड तपासले. यात वैध संधीपेक्षा जास्त वेळा परीक्षा देणारी पूजा खेडकर ही एकमेव असल्याचे समोर आले. पूजा खेडकरने वैध संधींपेक्षा जास्त परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पण तिने नेमकी किती वेळा परीक्षा दिली याबद्दल माहिती नाही. कारण पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली. त्यामुळे याबद्दलचा निश्चित आकडा मिळलेला नाही, असेही यूपीएससीने म्हटले आहे.
हे ही वाचा : SC-ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, सगळी गणितं बदलणार!
दरम्यान यूपीएससी आयोगाने पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली होती. ३० जुलै दुपारी ३.३० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. पण, वेळ वाढवून देऊनही पूजा खेडकर उत्तर देऊ शकली नाही.
ADVERTISEMENT