Tejas Thackeray New Snake Species : शिवसेनेचे (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि वन्यजीव संशोधनात रस असलेल्या तेजस ठाकरे यांनी सापाची नवी प्रजाती शोधली आहे. तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने सह्याद्रीच्या खोऱ्यात सापाची ही नवी प्रजाती शोधली आहे. सापाच्या नव्या प्रजातीला नावही देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमला पश्चिम घाटात संशोधन करताना सापाची ही नवी प्रजाती आढळून आली. या सापाच्या या नव्या प्रजातीला सह्याद्रीओफिस असे नाव देण्यात आले आहे.
वाचा >> Tejas Thackeray हे ठाकरे कुटुंबाचे Vivian Richards, वाचा कोणत्या नेत्यानं केलं आहे कौतुक?
सापाच्या नव्या प्रजातीसंदर्भातील शोधनिबंध लंडनमधील नॅशनल हिस्ट्री म्युझियम आणि जर्मनीतील प्लँक इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
सापाच्या नावाचा अर्थ काय?
सह्याद्रीओफिस उत्तराघाटी असे नाव या सापाच्या नव्या प्रजातीला देण्यात आले आहे. यामध्ये संस्कृत शब्द सह्याद्री आणि ग्रीक शब्द ओफिस म्हणजे साफ अशा दोन्हींचा संगम घडवून नाव दिले गेले आहे. मराठी या सापाला उत्तराघाटी साप असे नाव दिले गेले आहे. याचा अर्थ उत्तरा म्हणजे उत्तर दिशा दर्शवणारी आणि घाटी म्हणजे पर्वत किंवा घाटात वास्तव्य असणारा. त्यामुळे हे नाव दिले गेले आहे.
वाचा >> तेजस राजकारणात येणार का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे उत्तर देत विषयच संपवला
तेजस ठाकरे यांना वन्यजीव संशोधनाची आवड आहे. ते सुरुवातीपासूनच या क्षेत्रात काम करतात. वेगवेगळ्या वन्य प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. तेजस ठाकरे यांनी यापूर्वी पाल, मासे, खेकडे यासह इतर वन्य प्राण्यांच्या 11 पेक्षा अधिक प्रजाती शोधून काढल्या आणि त्या जगासमोर आणल्या आहेत.
ADVERTISEMENT