आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीतील अधिष्ठान म्हणजे काय.. श्री सदस्यांना कसं मिळतं?

मुंबई तक

• 11:46 AM • 22 Apr 2023

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीस जाणाऱ्या श्री सदस्यांच्या घरी कशी केली जाते अधिष्ठानाची स्थापना. बैठकीतील अधिष्ठान म्हणजे नेमकं काय.. जाणून घ्या सविस्तर.

what is appasaheb dharmadhikaris shree samarth baithak and adhisthana how do shre sevak get this

what is appasaheb dharmadhikaris shree samarth baithak and adhisthana how do shre sevak get this

follow google news

मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 14 श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यानंतर सरकार आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या दोन्हींवर अनेकांनी टीका केली. याच सगळ्या प्रकरणामुळे महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) आणि त्यांची श्री समर्थ बैठक या गोष्टी चर्चेत आल्या. श्री समर्थ बैठक म्हणजे काय?, इथे नेमकी काय शिकवण दिली जाते हे आपण याआधी पाहिलंच आहे. आता आपण जाणून घेऊयात की, ज्या अधिष्ठानाला सर्वश्रेष्ठ मानून श्री समर्थ बैठक चालते ते अधिष्ठान नेमकं काय आणि ते श्री सदस्यांच्या घरी नेमकं येतं कसं? याचबाबत या लेखातून आपण जाणून घेऊया. (what is appasaheb dharmadhikaris shree samarth baithak and adhisthana how do shre sevak get this)

हे वाचलं का?

महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ बैठकीची सुरुवात केली. दासबोधचं चिंतन करुन नानासाहेबांनी आपल्या निरुपणांना सुरुवात केली. ज्याद्वारे त्यांनी संत साहित्याचा प्रसार केला. तसेच सामाजिक मूल्य कशाप्रकारे जपली जावीत यावरही भाष्य केलं.

मात्र, असं असलं तरीही नानासाहेब धर्माधिकारी यांना या गोष्टीची जाणीव होती की, फक्त निरुपणाने लोक त्यांच्या परमार्थ मार्गाकडे वळणार नाहीत. तर त्यासाठी एखाद्या अधिष्ठानाची देखील गरज आहे.

हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

त्यामुळेच जेव्हापासून धर्माधिकारींनी समर्थ बैठकीला सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी एकमुखी दत्त असलेल्या अधिष्ठानाची स्थापना केली. याच अधिष्ठानाची नंतर श्री सदस्यांच्या घरी देखील स्थापना केली जाऊ लागली. हे अधिष्ठान म्हणजे कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेले एकमुखी दत्त यांचा एक फोटो असतो.

श्री सदस्यांना अधिष्ठान कसं मिळतं?

मात्र, श्री समर्थ बैठकीचं हे अधिष्ठान प्रत्येक श्री सदस्याला मिळतेच असे नाही. यासाठी बैठकीत जाणाऱ्या श्री सदस्यांना एक विशिष्ट निवेदन द्यावं लागतं. त्या निवेदनाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्याकडून मान्यता मिळते त्यानंतरच संबंधित श्री सदस्यांच्या घरी अधिष्ठानाची स्थापना केली जाते.

या अधिष्ठानाची बैठकीतील श्री सदस्यांच्याच मार्फत विधिवत स्थापना केली जाते. ज्या श्री सदस्याच्या घरी ही स्थापना असते त्याला दररोज न चुकता त्या अधिष्ठानाची पूजा करावी लागते. यावेळी पुजेदरम्यान, त्यांना एकमुखी दत्ताच्या चरणी चंदनलेप असलेलं तुळशीपत्र देखील लावावं लागतं.

अधिष्ठान असलेल्या श्री सदस्यांना समर्थ बैठकीत कोणते अधिकार मिळतात?

श्री समर्थ बैठकीस जाणाऱ्या सदस्यांना अधिष्ठान मिळणं ही एक प्रकारची मोठी उपलब्धी असते. कारण यानंतरच बैठकीतील अनेक गोष्टींसाठी त्या सदस्यांना मुभा मिळते.

बैठकीतील महत्त्वाचा भाग म्हणजे निरुपण. पण बैठकीतील प्रत्येक व्यक्तीला निरुपण करता येतं.. असं नाही.. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीच्या घरी अधिष्ठान असणं गरजेचं आहे. तसंच निरुपणासाठी त्याने निवेदन देणं गरजेचं आहे. त्या निवेदनाला प्रतिष्ठानकडून मान्यता मिळणं देखील गरजेचं आहे. तरच श्री सदस्याला निरुपण करता येतं.

हे ही वाचा>> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?

याशिवाय ज्या श्री सदस्याच्या घरी अधिष्ठान असेल आणि त्याच्या घरी मोकळी जागा असेल तर त्या श्री सदस्याच्या घरी बैठकही भरवली जाते. म्हणजेच त्यासाठी अधिष्ठान असणं आवश्यक आहे.

याशिवाय बैठकीत निरुपण हे दासबोधावर केलं जातं. त्यामुळे निरुपण करणाऱ्या व्यक्तीसोबत दासबोध वाचणारी व्यक्ती देखील व्यासपीठावर बसते. पण ज्या प्रमाणे अधिष्ठान असलेल्या व्यक्तीलाच निरुपण करता येतं तसंच ज्या व्यक्तीच्या घरी अधिष्ठान आहे त्यालाच निरुपणकारासोबत व्यासपीठावर बसून दासोबध वाचण्यास अनुमती असते. किंवा.. जर एखादा श्री सदस्य बालभक्ती बैठकीला निरुपण करत असेल तरच त्याला दासबोध वाचनाची संधी मिळते.

याशिवाय ज्या श्री सदस्यांच्या घरी अधिष्ठान असतं त्यांच्याच घरी नानासाहेब, शारदाताई, आप्पासाहेब, त्यांच्या पत्नी आणि सचिन धर्माधिकारी यांचे फोटो लावण्याची परवानगी असते. हे सगळे फोटो अधिष्ठानाच्या बाजूलाच लावले जातात.

सर्व श्री सदस्यांना अधिष्ठान मिळतं का?

श्री समर्थ बैठकीस जाणाऱ्या सर्व श्री सदस्यांना अधिष्ठान मिळतंच असं नाही. सर्वात आधी त्यासाठी अट अशी असते की, शक्यतो घरातील प्रत्येक व्यक्तीने बैठकीस जाणं गरजेचं असतं. किंवा कर्त्या पुरुषाने तरी बैठकीला जावं असा बैठकीचा नियम किंवा दंडक असतो.

हे ही वाचा>> खारघर दुर्घटना: महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अद्यापही मीडियासमोर आपली बाजू का नाही मांडली?

समजा, एखाद्या घरातील केवळ स्त्री आणि तिची मुलं बैठकीस जात असतील पण तिचा पती जर बैठकीस जात नसेल तर त्या महिलेच्या घरी अधिष्ठान स्थापना होत नाही.

    follow whatsapp