Yavatmal News : लग्नात आता जेवढे धार्मिक विधी महत्वाचे असतात, तेवढेच महत्वाचे आहेत सध्याचे ट्रेंड्स. अशाच ट्रेंडसपैकी एक म्हणेज प्री वेडिंग फोटोशूट. खास लोकेशनवर रोमँटीक अंदाजात केलेले प्री वेडिंग फोटोशूट केलं. सोशल मीडियावर सध्य या फोटोशूटची चांगलीच चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> खोक्या, हरीण, लॉरेन्स ते खून... सुरेश धस यांनी केलेला 'तो' खळबळजनक दावा नेमका काय?
आपल्या लग्नासाठी शूट केलेल्या एका खास प्री-वेडिंग व्हिडीओमध्ये मंदार पत्की यांनी शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता आणि आत्मीयता व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, त्यांच्या या क्लपनेचं कौतुक होतंय आहे. आनंदाच्या या क्षणातही शेतकऱ्यांशी असलेला त्यांचा बॉन्ड कसा कायम आहे हे त्यांनी दाखवलं आहे.
मंदार पत्की, भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत, त्यांनी आपल्या भावी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी हा खास संदेश देण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्यांच्या या जोडप्यानं शेतकऱ्यांच्या साध्या वेशात शूट केलं. ज्यामध्ये दोघंही बैलगाडीवर बसून संवाद साधतायत. तसंच पुढे गाण्यावर याच ठिकाणी ते डान्स करताना दिसत आहे.
हे ही वाचा >> इफ्तारीचे फळ वाटताना झाला होता वाद, 20 वर्षीय तरूणाला चाकूने भोसकून संपवलं
कुठल्याही महागड्या लोकेशनवर जाऊन शूट न करता असं शेतकऱ्याच्या स्टाईलमध्ये केलेलं हे शूट चांगलंच व्हायरल होताना दिसतंय. मंदार पत्की यांच्या या प्री-वेडिंग व्हिडीओने प्रशासकीय अधिकाऱ्याच्या सामाजिक बांधिलकीचं एक नवं उदाहरण समोर आणलं आहे. तर संपूर्ण व्हिडीओ लवकरच त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने प्रसिद्ध केला जाईल अशी शक्यता आहे.
मंदार पत्की मोठ्या संघर्षातून झाले IAS अधिकारी
मंदार पत्की यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली होती. 2017 मध्ये त्यांनी देशभरात 22 वा क्रमांक मिळवला होता. त्यांचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, कारण त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय, स्वतःच्या मेहनतीने आणि नियोजनाने हे यश मिळवलं.
मंदार पत्की यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आणि नंतर पदवी प्राप्त केली. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतःला कधीच खूप हुशार विद्यार्थी मानत नव्हते, पण त्यांनी मेहनत आणि सातत्य यावर भर दिला.
ADVERTISEMENT
