Anant Ambani Video: जामनगर: भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबातील धाकटे सदस्य अनंत अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या चर्चेचे कारण आहे त्यांचा प्राणीप्रेमाचा एक अनोखा किस्सा, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनंत अंबानी हे सध्या जामनगर ते द्वारका अशी पदयात्रा करत आहेत. याच दरम्यान, त्यांना नुकतंच रस्त्यावर एका टेम्पोमधून कोंबड्या विक्रीसाठी नेत असल्याचे दिसलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व कोंबड्या विकत घेऊन त्यांचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेतला. याच घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी यांना रस्त्यावर एक टेम्पो थांबलेला दिसतो. या टेम्पोमध्ये अनेक कोंबड्या पिंजऱ्यांमध्ये कोंबलेल्या दिसल्या, ज्या बाजारात ने्ल्या जात होत्या. हे दृश्य पाहून अनंत अंबानी यांचे मन हेलावले. व्हिडिओमध्ये ते त्यांच्या टीमला सांगताना दिसतात, "या टेम्पोच्या मालकाला त्याच्या कोंबड्यांचे पैसे द्या. आपण या सर्व कोंबड्या विकत घेतोय आणि त्यांना वाचवा." त्यांच्या या संवेदनशील कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील अपलोड करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> lalbaugcha Raja: अनंत मंडळात येताच अंबानींकडून 'लालबागच्या राजा'चरणी 20 किलोचा सोन्याचा मुकूट
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यावर तो प्रचंड व्हायरल झाला. X, Instagram आणि WhatsApp सारख्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ वेगाने पसरला आणि अनेकांनी अनंत अंबानी यांच्या या दयाळूपणाचे आणि प्राणीप्रेमाचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, "अनंत अंबानी यांनी दाखवलेली ही दया खरोखरच प्रेरणादायी आहे. श्रीमंत असूनही त्यांचा हा साधेपणा आणि प्राणीप्रेम सर्वांसाठी एक आदर्श आहे." दुसऱ्या एका युजरने टिप्पणी केली, "हा व्हिडिओ पाहून माझे मन भरून आले. अशा माणसांमुळे जग अजूनही सुंदर आहे."
काही युजर्सनी या घटनेचा उल्लेख "हृदयस्पर्शी" असा केला, तर काहींनी अनंत अंबानी यांच्या या कृतीला प्राणी संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले.
हे ही वाचा>> lalbaugcha Raja : अनंत अंबानींवर 'लालबागचा राजा' मंडळाची मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती का केली?
अनंत अंबानी आणि प्राणीप्रेम
या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्या प्राणीप्रेमाची आणखी एक झलक समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनंत अंबानी यांनी विकत घेतलेल्या या कोंबड्यांना 'वंतारा' प्रकल्पात नेऊन त्यांची योग्य काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, अनंत अंबानींचा हा व्हिडिओ खरा असल्याचं दिसतं आहे. सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जामनगर ते द्वारका या मार्गावर घडली असून, अनंत अंबानी यांनी खरोखरच या कोंबड्या विकत घेऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. तथापि, या घटनेचे अधिकृत पुष्टीकरण अंबानी कुटुंबाकडून किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून अद्याप मिळालेले नाही.
अनेकांनी अनंत अंबानी यांच्या या कृतीला प्राणी कल्याणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारी कृती मानले आहे. काही प्राणीप्रेमी संघटनांनीही या कृतीचे स्वागत केले असून, अशा प्रकारच्या संवेदनशील कृतींमुळे समाजात प्राण्यांबद्दल जागरूकता वाढेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनंत अंबानी यांच्या या कृतीने जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून, हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
