आरारारारा! Ghibli ने महिलांच्या फोटोत केली मोठी गडबड, Viral फोटो पाहून पोट धरून हसाल

Ghibli Trend Gone Wrong : जगभरात सोशल मीडिया यूजर्सला Ghibli आर्ट स्टूडियोचं प्रचंड वेड लागलं आहे. यूजर्स आपला फोटो Ghibli व्हर्जनमध्ये कन्वर्ट करून इंटरनेटवर शेअर करतात.

Ghibli Trend Gone Wrong

Ghibli Trend Gone Wrong

मुंबई तक

02 Apr 2025 (अपडेटेड: 02 Apr 2025, 04:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Ghibli च्या फोटोंनी सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

point

नारळाऐवजी थाळीत दिसलं चक्क महिलेचं डोकं

point

घिबलीचा तो व्हायरल फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Ghibli Trend Gone Wrong : जगभरात सोशल मीडिया यूजर्सला Ghibli आर्ट स्टूडियोचं प्रचंड वेड लागलं आहे. यूजर्स आपला फोटो Ghibli व्हर्जनमध्ये कन्वर्ट करून इंटरनेटवर शेअर करतात. बॉलिवूडपासून हॉलिवूड स्टार्सही Ghibli व्हर्जनचे फोटो शेअर करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी त्यांच्या फोटोचा गिभली अवतार शेअर केला आहे. क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंनाही Ghibli चं प्रचंड वेड लागलं आहे.

हे वाचलं का?

फिल्मचे पोस्टर आणि त्या चित्रपटातील स्टारकास्टचे गिभली फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. परंतु, Ghibli ट्रेंड गॉन रॉन्ग असंही भन्नाट प्रकार पाहायला मिळत आहे. कारण काही फोटोंमध्ये घिबलीने गडबड केल्याचं पाहायला मिळतंय. कारण महिलांचा छठ पूजेचा फोटो घिबली व्हर्जन फोटो समोर आला आहे. या फोटोत पूजेच्या थाळीत असलेल्या नारळाऐवजी एका महिलेचं डोकं असल्याचं पाहायला मिळत आहे.

नारळाऐवजी थाळीत दिसलं चक्क महिलेचं डोकं

एआय जनरेटेड Ghibli व्हर्जनचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो बिहारमधील छठ पूजेचा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला हातात पूजेची थाळी घेऊन उभ्या आहेत. यात नारळ, फळ आणि पूजेचा खूप सामान आहे. परंतु, जेव्हा या फोटोला चॅट जीपीटीच्या माध्यमातून घिबली व्हर्जनमध्ये बदलायला सांगितलं, तेव्हा सर्वांना थक्क करणारा फोटो समोर आला. या फोटोत दिसतंय की, थाळीत पूजेच्या सामानाऐवजी एका महिलेचं डोकं आहे.

हे ही वाचा >> लग्न ठरलं, प्री-वेडिंग झालं, पण मुलगा आवडेना... मुलीने थेट सुपारी दिली, कट रचला, मुलगा थोडक्यात वाचला

चॅट जीपीटी आणि घिबलीने गडबड केलेल्या या फोटोला पाहून लोकंही चक्रावून  गेली आहेत. तसच काही लोकांनी घिबली ट्रेंड गॉन रॉन्ग असा मेसेजही सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. Ghibli ट्रेंड गॉन रॉन्गमध्ये एक फोटो नाही, तर हजारो अशे फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये घिबलीने गडबड केल्याचं पाहायला मिळत आहे. काही सोशल मीडिया यूजर्सने चॅट जीपीटी आणि घिबलीला घोस्ट डिटेक्टर म्हटलं आहे. 

हे ही वाचा >> लग्न ठरलं, प्री-वेडिंग झालं, पण मुलगा आवडेना... मुलीने थेट सुपारी दिली, कट रचला, मुलगा थोडक्यात वाचला

    follow whatsapp