Kanpur Criem: कानपूरमधील गंगा घाटाजवळ खलाशांना रेल्वे लाईनच्या खाली जखमी आणि निर्वस्त्र अवस्थेत एक महिला (naked woman) आढळून आली. ज्या खलाशांनी ती आढळून आली त्यांनी सांगितले की, ती आढळली त्यावेली तिच्या अंगावर एकही कापड नव्हते. मात्र त्यावेळी ती प्रचंड रडत होती. महिलेची अवस्था पाहून खलाशांनी गंगा घाटावरील पांडा राजू यांना त्या महिलेची माहिती देण्यात आली. त्यानंतर राजू यांनी तिच्यासाठी कपडे आणून तिला दिले. त्यानंतर तिची ही अवस्था का आणि कोणी केली याची विचारणा केली, व या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
ADVERTISEMENT
पुलावरून खाली फेकलं
गंगा घाटावरील खलाशांनी तिची माहिती तिला विचारून घेतली. त्यावेळी तिने सांगितले की, मंगळवारी सकाळी सहा ते सात वाजता ट्रेनमधून जात असताना काही लोकांनी तिला धक्का दिली, आणि त्या धक्क्यामुळे ती ट्रेनमधून खाली नदीत पडली. नदीत पाणी कमी असल्यामुळे ती पाण्यातून हळूहळू ती नदीच्या काठावरही आली. मात्र त्यावेळी तिला प्रचंड जखमा झाल्या होत्या. ही माहिती तिने सांगितल्यानंतर पांडा राजूंनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही गंगा नदी घाटावर येत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा >>Pune : पुण्यात मद्यधुंद तरूणीचा धिंगाणा! पोलिसांवर हात उगारला, सोसायटीत राडा…
कोणी केली छेडछाड
गंगा नदी घाटावर नग्न अवस्थेत महिला सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिची ती अवस्था का झाली. तिच्यावर अत्याचार झाला आहे का किंवा तिची कोणी छेडछाड वगैरे काढली आहे का त्याचा तपास पोलीस करत होते. मात्र तिला मानसिक धक्का बसल्याने महिला बोलण्याच्या आणि उत्तरं देण्याच्या मानसिकतेत नव्हती. त्यासाठी आता पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आधी विवस्त्र केलं
मात्र पांडा राजू यांनी सांगितले की, गंगा घाटावर जेव्हा ती महिला विवस्त्र अवस्थेत सापडली तेव्हा ती प्रचंड घाबरली होती. तिच्या शरीरावर एकही कापड नव्हतं पण शरीरावर काही जखमाही झाल्या होत्या. तिला 80 फुटावर असलेल्या पुलावरून खाली नदीत फेकून देण्यात आले होते. त्यामुळेच तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या.
पोलिसांच्या हद्दीचा प्रश्न
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता तपास करण्यात येणार असून ज्या पुलावरून तिला फेकण्यात आले आहे. तो पूल उन्नाव पोलिसांच्या हद्दीत येत असून त्या संदर्भात माहिती घेऊन आता रेल्वेतून का फेकण्यात आले आणि कोणी फेकले त्याची माहिती घेतली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT