Baba Siddique Case : नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शार्प शूटरच्या मुसक्या आवळल्या, मोठी अपडेट

मुंबई तक

11 Nov 2024 (अपडेटेड: 11 Nov 2024, 04:11 PM)

उत्तर प्रदेशच्या बहराइचमधून नेपाळला पळून जाण्याच्या विचारात असतानाचपोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट

point

शार्प शूटर शिवकुमारला अटक

point

चौकशीत समोर आल्या धक्कादायक गोष्टी

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफला मोठं यश मिळालं आहे. दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या पथकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शूटर शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिवकुमार हा उत्तर प्रदेशच्या बहराइचमधून नेपाळला पळून जाण्याच्या विचारात असतानाचपोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. बाबा सिद्दीकी यांचा खून केल्यानंतर तो मुंबईतून पुण्याला गेला होता. त्यानंतर तिथून झाशीमार्गे लखनऊला पोहोचला. शिवकुमारचे चारही साथीदार बहराइचमध्ये पकडले गेले होते. आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणातल्या अनेक मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत. 

हे वाचलं का?

 

बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे कुणाचा हात?

हे ही वाचा >>Shahaji Bapu Patil: '...म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना सहन करतोय', शहाजीबापूंचं मोठं विधान!

साबरमती तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल हा बाबा कॅनडामध्ये राहत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे अनमोलचा हात असल्याचा आरोप आहे. तरीही अजून तोच मुख्य सुत्रधार असल्याचं स्पष्ट झालं नाही. शूटर शिव कुमारने अनमोल बिश्नोईशी बोलून बाबा सिद्दिकीच्या हत्येसाठी 10 लाख रुपये आणि महिन्याला काही ठराविक रक्कम लागेल अशी मागणी केली होती.

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार आरोपींचं लोकेशन माहिती झाल्यानंतर, त्यांनी उत्तर प्रदेशच्या एसटीएफसह छापा टाकला. या कारवाईमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे 21 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सामील होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईत आणण्यात येत आहे. इथे आरोपींना कोर्टात हजर करण्यात येईल. त्यानंतर चौकशी करून मुख्य सूत्रधार कोण आहे यासाठीचे पुरावे गोळा करुन चौकशी केली जाणार आहे. सूत्रधार शुभम लोणकर आणि सूत्रधार मोहम्मद झिशान अख्तर हे अद्याप फरार आहेत. दोघांच्या शोधासाठी पथकं छापे टाकत आहेत.

 

शिवकुमार मुंबईत कसा पोहोचला होता?

 

शिव कुमार उर्फ ​​शिवा हा फक्त 20 वर्षांचा असून, काही वर्षांपूर्वी पुण्यात मजूर म्हणून आला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात त्याने धर्मराज कश्यप (19) यालाही कामावर सोबत घेतलं होतं. शिवा आणि धर्मराज हे दोघंही उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गंडारा गावचे रहिवासी आहेत. शिवाचे वडील बाळकृष्ण हे गवंडीकाम काम करतात. पोलिसांनी शूटर धर्मराज कश्यप आणि गुरमेल बलजीत सिंग यांना घटनास्थळावरून अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी प्रवीण लोणकर यालाही अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम लोणकर याने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वतीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट केली होती.त्यामुळे हे संपूर्ण नेटवर्क पोलिसांना सापडलं.

 

शार्प शूटर शिवकुमार कट रचणाऱ्यांच्या संपर्कात कसा आला?

 

उत्तर प्रेदश एसटीएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितलं की, तो पुण्यातील एका रद्दीच्या दुकानात काम करत होता. त्याच्या शेजारीच शुभम लोणकर याचं दुकान होतं. शुभम लोणकर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करत असल्याची माहिती आहे. त्याने स्नॅप चॅटद्वारे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी अनेक वेळा चर्चा केली. बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या बदल्यात शिवकुमारला 10 लाख रुपये मिळतील आणि दर महिन्याला काही रक्कम मिळेल असं सांगण्यात आलं होतं असं शिवकुमारने सांगितलं आहे.


आरोपी शिवकुमारने दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोणकर आणि मोहम्मद यासीन अख्तर यांनी हत्येसाठी त्याला शस्त्र, काडतुसे, एक मोबाइल फोन आणि सिमकार्ड दिले होते. तसंच हत्येनंतर तिन्ही शूटर्सना एकमेकांशी बोलण्यासाठी नवीन सिम आणि मोबाईल फोन देण्यात आले होते. हत्येपूर्वी आणि नंतर वापरण्यासाठी सर्वांना वेगवेगळे सिम आणि वेगवेगळे नवीन मोबाईल देण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून शूटर मुंबईत राहत होते. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर तिन्ही शूटर जम्मूला जाऊन वैष्णोदेवी येथे भेटणार होते. पण, दोन साथीदारांना घटनास्थळीच पकडल्यानं त्यांचा प्लॅन फसला.

    follow whatsapp