Punjab Postmaster Killed Four Family Member : पंजाबच्या जालंधरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेचा उलगडा होताच संपूर्ण देश हादरला. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यानुसार या घटनेतील चार जणांची हत्या ही कुटुंबप्रमुख पोस्टरमास्टर मनमोहनने केल्याचे समोर आले आहे. या हत्येनंतर त्याने देखील गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता पोस्टरमास्टर मनमोहनवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच घटनास्थळावर पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोटही सापडली आहे. ही सुसाईड नोट आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करणार आहे. (punjab jalandhar adampur 4 family member kill and one commit suicide shocking crime story)
ADVERTISEMENT
मनमोहन यांनी रविवारी 31 डिसेंबरच्या रात्री पत्नी ,सरबजीत कौर, मोठी मुलगी प्रभज्योत कौर ऊर्फ ज्योती (32), धाकटी मुलगी गुरप्रीय कौर उर्फ गोपी (31) आणि 3 वर्षीय नातू अमन यांची गळा घोटून हत्या केली होती. या हत्येनतर मनमोहन यांनी स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेत शेजाऱ्यांना मनमोहन यांच्या घरात काहीच हालचाल न दिसल्याने त्यांना संशय आला. या संशयातून पोलिसांद्वारे चौकशी केली असता, या घटनेचा उलगडा झाला होता. या प्रकरणात पोलिसांना एक पाणी सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमधून घटनेचा उलगडा होईल.
हे ही वाचा : Manoj Jarange : CM शिंदेंनी केला फोन, जरांगेंनी दिला नकार; कॉलवर काय झालं बोलणं?
मनमोहन यांनी 1 लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज व्याज आकारून 25 लाख झाले होते. यामध्ये मी 70 लाख भरले होते. तरी कर्ज फिटत नव्हतं. घरच्यांनाही कळालेलं माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. आणि मी मेलो नाही तर कर्ज देणारे मला सोडणार नाहीत. त्यामुळेच मनमोहन यांनी कुटुबियांची हत्या केली आणि स्वत: आत्महत्या केली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय?
मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाची फसवणूक केली नाही.पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. ज्याने माझ्याशी मैत्री केली त्यानेच विश्वासघात केल्याचे मनमोहन सुसाईड नोटमध्ये लिहतात. मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. यासाठी मी 6 लाखाचे कर्ज घेतले. पण काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर मी पोस्ट ऑफिसचे मुदत ठेव प्रमाणपत्र छापण्याचे काम सुरु केले. पण त्यातही काही झाले नाही. त्यानंतर मी फिल्म मेकर्ससोबत कामाला सुरूवात केली. मात्र तेही कामी आले नाही आणि साथिदार पैसे घेऊन निघून गेले.
मनमोहन यांनी जवळच्या मंडळीकडून पैसे घेऊन ते सगळीकडे गुंतवले. कर्ज फेडण्यासाठी अधिक व्याजदर घ्यावे लागले. या सर्व गोष्टीची कल्पना घरातील एकाही व्यक्तीला नव्हती. कारण पैशाचे व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होत होते.
मनमोहन यांनी 1 लाख घेतले आणि काही काळाने ते 14 लाख झाले. हीच रक्कम पुढे जाऊन जवळपास 25 लाखापर्यंत पोहोचली. या संपूर्ण पैशावर दरमहा 50 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज होते. आतापर्यंत सर्वजणांकजडून 70 लाखांहून अधिक रक्कम घेतली होती.त्यामुळे कर्ज काही फिटत नव्हतं. हे प्रकरण हाताबाहेर गेल्यावर या संपूर्ण घटनेची बातमी माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आता मृत्यूला मिठी मारल्याशिवाय पर्याय नव्हता. जर मृत्युला कवटाळले नाही तर पैसे घेणारे लोक सोडणार नाही असे मनमोहन यांनी सांगितले.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : राम मंदिर ते मिशन लोकसभा; मोदी-शाहांची खास रणनीती, समजून घ्या 4 मुद्दे
सरकारला विनंती
मनमोहन यांनी या सुसाईड नोटमध्ये सरकारला देखील विनंती केली आहे. माझ्याकडे आता पैसै नाहीत. त्यामुळे सर्वांचे हक्काचे पैसे परत मिळावेत, अशी सरकारकडून मला अपेक्षा आहे. तसेच शक्य असल्यास सरकारने आमच्यावर अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी आणि गँस चेंबरमध्ये करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.
ADVERTISEMENT