Beed Case New CCTV Footage:योगेश काशिद, बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. सरपंचांची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी धाराशिव जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडी सोडून पसार झाले, वाशी येथे गाडी सोडून आरोपी पळताना व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. फरार होणाऱ्या आरोपींमध्ये कृष्णा आंधळेचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एका काळ्या स्कॉर्पिओतून सहा आरोपी वाशी शहरात येऊन थांबतात. त्यानंतर गर्दीने गजबजलेल्या रस्त्यात स्कॉर्पिओ थांबवली जाते आणि त्यानंतर १, २, ३, ४, ५ आणि ६ असे सर्व आरोपी गाडी सोडून पळ काढतात.
आरोपी फरार होत असताना स्थानिकांना नेमकं काय घडतंय? याचा अंदाज आला नाही. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे तपासातून काही गोष्टी बाहेर येणार का? यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजप आमदार सुरेश धसांनी केलेले गंभीर आरोप
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी कृष्णा आंधळे अजून फरार आहे, त्याच्या घातपात झालाय का? पुरावे नष्ट करण्याची भीती धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलीय.
यावर सुरेश धस म्हणाले, धनंजय जे बोलतो आहे, ते चुकीचे बोलतोय अशातला भाग नाही. परंतु, कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे? तो का पुरावे नष्ट करतोय, पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटे आणि ह्यांनी केलेलं आहे. विष्णू चाटेने दहा तारखेनंतर एकमेकांशी म्हणजेच आकाशी आणि त्याच्याशी झालेलं बोलणं सीआयडीसमोर जाऊ नये, असा प्रयत्न केलेला आहे. परंतु, तो त्यांचा प्रयत्न राहणार नाही. पोलीस लोक त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला? मला वाटतं मोबाईल बंद करून त्यांनी पाण्यात टाकला असावा. ते लवकरात लवकर सापडेल.असं सुरेश धस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
ADVERTISEMENT
