Jalna Crime News : जालन्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे आईच्या प्रियकराकडून या चिमुकलीवर हा अत्याचार करण्यात आलेला आहे. जालना पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रशांत प्रकाश वाडेकर असं या आरोपीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
पतीपासून विभक्त महिला...
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक 28 वर्षीय महिला पतीपासून विभक्त झालेली आहे. ही महिला जुना जालना भागात राहत आहे. तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा झालेला आहे. त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतीकडे जिंतूरमध्ये राहतात. तर एक 6 आणि दुसरी 4 वर्षांची मुलगी त्या महिलेकडे राहते. सदर महिला साफसफाई आणि घरगुती काम करून तिचा व मुलींचा उदरनिर्वाह भागवते.
हे ही वाचा >> सोवळं-जाणवं नसल्यानं रामदास तडस यांना रोखलं, रामनवमीच्या दिवशी मंदिरात काय घडलं?
प्रेम प्रकरणाला सुरूवात...
दोन वर्षांपूर्वी या महिलेची ओळख एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याशी झाली. तेंव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघंही त्याच खोलीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सदर महिला दुपारी 3.30 वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते, तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री 7.30 वाजेनंतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जातो.
चिमुकलीसोबत अनैसर्गिक कृत्य
प्रशांत प्रकाश वाडेकर याने त्याची प्रेयसी असलेली महिला घरी नसतांना 6 वर्षीय मुलीसोबत आधी अनैसर्गिक कृत्ये केलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चिमुकलीला खूप ताप आला होता. चिमुकलीला उलट्याही होत होत्या. वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यापूर्वीही वाडेकर याने त्या चिमुकल्या बालिकेसोबत असे घाणेरडे प्रकार केल्याचं तिने आईला सांगितलं.
हे ही वाचा >> 'दीनानाथ'वरुन भाजपमध्ये दोन गट, खासदारांनी शहराध्यक्षांना झापलं!
दरम्यान, हे सर्व कळल्यानंतर सदर महिलेने तातडीनं कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यावेळी कदीम जालना पोलिसांनी तातडीने आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर यास ताब्यात घेतलं. तसंच हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, जालना शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
