Crime News : वाराणसीत एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. 23 जणांनी मिळून 7 दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आरोपी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार करायचे. जबरदस्ती मद्य देऊन अत्याचार करायचे, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर लालपूर पांडेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 6 आरोपींना अटक केली असून इतर आरोपी फरार आहे.
ADVERTISEMENT
29 मार्चला पीडिता घराबाहेर पडली अन् घडलं...
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, 29 मार्चला पीडित मुलगी घराबाहेर पडली. ती तिच्या मैत्रिणींच्या घरी जात होती. तिथून परत येत असताना तिला राज विश्वकर्मा नावाचा तरुण रस्त्यात भेटला. तो तिला एका कॅफेत घेऊन गेला. तिथे त्याने रात्रभर तिच्यासोबत चुकीचं काम केलं. त्यानंतर 30 तारखेला समीर नावाचा मुलगा त्याच्या मित्रासह पीडित मुलीला बाईकवर घेऊन गेला. हायवेवर तिच्यासोबत अत्याचार केला. त्यानंतर 31 तारखेला आयुष नावाचा मुलगा त्याचे 5 मित्र, सोहेल, दानिश, अनमोल, साजिद आणि जहिरसोबत पीडितेला घेऊन गेला.
हे ही वाचा >> एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि ती महिला अधिकारी... प्रकरण नेमकं काय?
त्यानंतर तिला जबरदस्ती मद्य दिलं आणि तिच्यासोबत सामुहिक बलात्कार केला. 1 एप्रिलला साजिद नावाचा मुलगा त्याच्या मित्रासह पीडितेला भेटला. त्यानंतर तो पीडितेला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे 2-3 लोक आधीपासून होते. त्यांनीही पीडितेसोबत अत्याचार केला. पीडितेने विरोध केला. परंतु, कोणीही तिचं ऐकलं नाही. त्यानंतर पीडितेला हॉटेलमधून बाहेर काढल गेलं. त्यानंतर इमरान नावाच्या मुलाने पीडितेला बाईकवर बसवून हॉटेलमध्ये नेलं. पीडित मुलगी ओरडली आणि त्याला विरोध केला. साजिदनेही त्याच्या 2 मित्रांसह तिच्यासोबत सामुहिक बलात्कार केला.
हे ही वाचा >> अमर आणि प्रेमचा खास 'अंदाज' पुन्हा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार, भाईजानने सांगितली तारीख
2 एप्रिलला पीडितेला राज खान नावाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत भेटला. त्यानंतर त्यांनी घराच्या छतावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केलं. त्यानंतर पीडिता 3 एप्रिलच्या दिवशी तिथून पळ काढत मित्राच्या घरी पोहोचली. त्या ठिकाणी असलेला दानिश आणि त्याच्या मित्रांनीही पीडितेसोबत सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर 4 एप्रिलला पीडिता घरी गेली आणि घडलेला संतापजनक प्रकार कुटुंबियांना सांगितला.या प्रकरणाबाबत वाराणसीचे डीसीपी चंद्रकांत मीणा यांनी म्हटलंय, 23 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 6 जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध शुरु आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT
