Nagpur : दोघं OYO मध्ये गेले अन् नग्नावस्थेतच तो आला बाहेर, नागपुरात काय घडलं? 

योगेश पांडे

22 Jul 2024 (अपडेटेड: 22 Jul 2024, 06:15 PM)

Nagpur Crime news : एका मित्राच्या माध्यमातून त्याची तरुणीशी ओळख झाली होती. तरुणाने तरुणीला फोन करुन भेटायला बोलावलं. दोघं दिवसभर नागपूर शहरात फिरले.

नागपूरमधील एका हॉटेलमध्ये तरुण तरुणीमध्ये वाद झाला.

नागपूरमध्ये एका तरुणीने एक तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये घडली धक्कादायक घटना

point

तरुणीने तरुणावर चाकूने केला हल्ला

point

OYO हॉटेलमध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये काय घडलं?

Nagpur Crime News : ते दोघं OYO Rooms वर गेले, रात्री नशा केला. पहाटे वाद झाला अन् तरुणीने थेट तरुणावर चाकुने वार केला. ही घटना नागपुरातील सिल्वर नेस्ट नावाच्या एका ह़ॉटेलमध्ये घडली. या घटनेमुळे नागपूर हादरलं असून, या घटनेत युवक युवती दोघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि तरुणीने तरुणावर वार का केले? (young girl did knife attack on her boyfriend in nagpur)

हे वाचलं का?

प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीवर वार केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. प्रेमातून टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. नागपुरात आता एक वेगळीच धक्कादायक घटना समोर आली आहे.

तो हॉटेलमध्ये नोकरीला, ती करते 'नीट'ची तयारी

अनिकेत देडगे हा तरुण नागपुरच्या एका सावजी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. तर तरुणी ही १९ वर्षांची असून मूळ चंद्रपुरची राहणारी आहे. नागपुरात राहून ती नीटची तयारी करते.
 
मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून त्याची तरुणीशी ओळख झाली होती. तरुणाने तरुणीला फोन करुन भेटायला बोलावलं. दोघं दिवसभर नागपूर शहरात फिरले. यावेळी त्यांनी नशा देखील केला.

हेही वाचा >> बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story

नागपूर फिरल्यानंतर रात्री साधारण १ च्या सुमारास दोघे OYO Rooms वर गेले. या दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले. पहाटे 5 च्या दरम्यान तरुणीने सिगारेटची मागणी केली. 

तरुणावर तरुणीने चाकूने हल्ला का केला?

दोघेही कारने नागपुरच्या मेडिकल स्क्वेअर येथे गेले. तिथे त्यांनी सिगारेट आणि हेल्थ ड्रिन्क घेतलं. त्यानंतर दोघं पुन्हा हॉटेलमध्ये आले. यावेळी पुन्हा त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. पण, त्यानंतर पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला.

या भांडणात तरुणीने तिच्या पर्समधून चाकू काढला आणि थेट तरुणावर हल्ला केला. या झटापटीमध्ये तरुणीच्या हाताला देखील चाकू लागला. या घटनेत तरुण नग्न अवस्थेतच हॉटेलमधून पळाला.

हेही वाचा >> लाडका भाऊ योजनेचा वेबसाइटवरून अर्ज भरा; पण आधी करा 'ही' गोष्ट, तरच...

पोलिसांना घटनेची माहिची मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या आरोपांवरुन तरुणाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे तर तरुणाच्या तक्रारीवरुन तरुणीवर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायेत. चूक नेमकी कोणाची होती, त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये नेमकं काय घटलं हे पोलीस तपासातूनच समोर येऊ शकणार आहे.

    follow whatsapp