Amravati Lok Sabha Costituncy: रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी आज अचानक अमरावतीतून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आणि वंचितला पाठिंबा जाहीर केला होता. या घडामोडीच्या काही तासानंतर प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचितने आंनदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर करत, अर्ज मागे घेऊ नये आणि उमेदवारी कायम ठेवावी,अशी विनंती केली आहे. या विनंतीनंतर आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (amaravai lok sabha constituncy vanchit prakash ambedkar withdraw candidate prajakta pillewan and support republic sena anandraj ambedkar navneet rana nomination form)
ADVERTISEMENT
खरं तर अमरावती लोकसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर आज अमरावती लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार होते. मात्र अचानक आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी मागे घेतली होती. आणि वंचितला पाठिंबा दिला होता. खरं तर अमरावतीतून वंचित आघाडी आनंदराज आंबेडकर पाठिंबा देणार असणार असल्याची चर्चा होती.
हे ही वाचा : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला धक्का, नवनीत राणांना 'सर्वोच्च' दिलासा!
मात्र प्रकाश आंबेडकरांनी अमरावतीतून प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारीही जाहीर केली होती. आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत देखील त्यांनी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला नव्हता. त्यामुळेच आज अचानक आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी मागे घेऊन वंचितला पाठिंबा दर्शवत प्रकाश आंबेडकरांना आरसा दाखवला.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना अखेर पत्र काढून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. आणि अर्ज मागे घेऊ नये आणि उमेदवारी कायम ठेवावी,अशी विनंती करावी लागली आहे. तसेच प्राजत्का पिल्लेवाण अमरावतीतून अर्ज भरणार नाही आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : 'मविआ'मध्ये ठिणगी! पटोले, थोरात बैठकीतून का गेले निघून?
वंचितचे संपूर्ण पत्र जसंच्या तसं
मा. आनंदराज आंबेडकर
यांस, सप्रेम जयभिम
अमरावती लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार अर्ज भरणार नाही, असे आपल्याला पक्षाकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या उमेदवाराला अर्ज दाखल करू नये, अशी स्पष्ट सूचना आम्ही दिली व त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यात आलेला नाही.
आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात लढणार असाल, तर आधी ठरल्याप्रमाणे आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा राहील. त्यामुळे आपण अर्ज मागे घेऊ नये व उमेदवारी कायम ठेवावी अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही करत आहोत.
रेखा ठाकूर
प्रदेशाध्यक्ष ,
वंचित बहुजन आघाडी
दरम्यान आता प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी मागे घेऊन आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दर्शवल्याने याचा निकालात किती फायदा होईल? व नवनीत राणा यांना याचा फायदा होणार का? हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT