Devendra Fadnavis criticized Dhairyasheel Mohite Patil : माढा लोकसभा मतदार संघातून राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्याला टार्गेट करायला सुरूवात केली आहे. याआधी ''माझा विश्वासघात केला तर त्यांचा सत्यानाश होईल'', अशी टीका फडणवीसांनी धैर्यशील मोहिले पाटलांवर (Dhairyasheel Mohite Patil)केली होती. त्यानंतर आता या तालुक्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार,असा हल्लाबोल फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोहिते पाटील घराण्यावर केला आहे. (devendra fadnavis criticized mohite patil family madha lok sabha election 2024 pm narendra modi ranjeet singh nimbalkar)
ADVERTISEMENT
माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेतून बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मोहिते पाटील घराण्यावर टीकास्त्र डागलं. रणजितदादांविरूद्ध जे उमेदवार उभे राहिलेत त्यांचा इतिहास बघा. मोहिते पाटील घराण्याने सामान्य माणसाला त्रास दिला. जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले. लोकांना प्रताडीत केले. हे सहन केले जाणार नाही. त्यामुळे मी या तालुक्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार,अशा शब्दात फडणवीसांनी मोहते पाटील घराण्यावर टीका केली.
हे ही वाचा : ठाकरेंकडून आलेल्या नेत्याला शिंदेंनी दिले तिकीट, 'या' मतदारसंघातून लढणार
दरम्यान मध्यंतरी सोलापूरात शरद पवार साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्र आले होते. या नेत्यांनी एकत्रित येऊन सांगितलं, आम्ही 30 वर्षांनी एकत्रित आलो आहोत. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी एकत्रित आलो आहोत. पण ही पुढची पिढी म्हणजे पवार साहेब सुप्रीयाताईंच्या भविष्यासाठी, सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरीता आणि विजयदादा धैर्यशील आणि रणजीतदादांच्या भविष्यासाठी एकत्र आले आहेत. तुमच्या भविष्याकरता एकत्रित आले नाहीत, अशा शब्दात त्यांना पवार-शिंदेंवर टीकेची तोफ डागली.
50-60 वर्ष ज्यांना आपण नेतृत्व दिलं, ते प्रत्येक निवडणकीत तीच ती भाषणे करायचे. तेच ते वादे करायचे.त्याच त्या घोषणा करायचे. पहिल्यांदा मोदीजींच्या सोबत रणजितदादांना पाठवलं. या ठिकाणी पाणी देखील आले. रेल्वे देखील आली. चिंता करू नका, 36 गावांच्या जागांचा प्रश्न बाकी आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे रणजितदादांच्या वतीने हे पाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा शब्दही फडणवीस यांनी नागरीकांना दिला.
ADVERTISEMENT