जावासोबत पळून गेलेली सासू तिच्या घरी कधी येणार? पोलीस स्टेशनमध्ये कुटुंबियांना म्हणाली "नवा संसार..."

Viral Love Story News Update : उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये सासू-जावयाच्या प्रेमकहाणीने आता एक नवीन मोड घेतला आहे. 39 वर्षीय सपना देवी तिचा होणारा जावई (राहुल) सोबत पळून गेली होती.

Aligarh Viral Love Story Update

Aligarh Viral Love Story Update

मुंबई तक

18 Apr 2025 (अपडेटेड: 18 Apr 2025, 05:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जावयासोबत पळून गेलेल्या सासूबाबत धक्कादायक माहिती समोर

point

सात वर्षांच्या मुलाला म्हणाली, "आपलं नातं संपलं, आता..."

point

पोलिस स्टेशनमध्ये सासू-जावयाचं केलं समुपदेशन

Viral Love Story News Update : उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये सासू-जावयाच्या प्रेमकहाणीने आता एक नवीन मोड घेतला आहे. 39 वर्षीय सपना देवी तिचा होणारा जावई (राहुल) सोबत पळून गेली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबात एकच खळबळ उडाली होती. परंतु, कुटुंबियांनी विनंती केल्यानंतरही सासू सपना घरी परत येण्यासाठी तयार होत नाहीय. मडराक पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिस स्टेशनमध्ये सपनाला भेटण्यासाठी तिचे कुटुंबीय, पती आणि 7 वर्षांचा मुलगा गेला होता. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिला घरी परतण्यासाठी विनंती केली. पण सपना देवीने घरी येण्यास नकार दिला.

हे वाचलं का?

"आता माझं तुझ्याशी काहीच नातं नाही"

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मडराक पोलीस स्टेशनमध्ये एसएचओच्या कार्यालयात महिलेचं समुपदेशन केलं गेलं. यादरम्यान, महिलेच्या कुटुंबातील सदस्य, दोन छोटी मुलं आणि तिचा पती तिथे उपस्थित होता. यावेळी आईला पाहून छोट्या मुलाचे डोळे पाणावले. रडत रडत तो मुलगा आईला म्हणाला, तू घरी परत ये. यावर सपना देवी त्याला म्हणाली की, आता तिचं कोणाशीही काही नातं राहिलं नाही.

हे ही वाचा >> सासू अनिता जावयासोबत का पळाली? खुद्द राहुलने केला खळबळजनक खुलासा; म्हणाला, "मी लग्नासाठी..."

तिला राहुलसोबतच राहायचं आहे. सपना देवीने पोलीस आणि तिच्या कुटुंबियांसमोर स्पष्ट केलं की, तिला आता राहुलसोबत जीवन जगण्याची इच्छा आहे. समुपदेशनाचा प्रयत्न फोल ठरला. राहुलला मडराक पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांच्या कस्टडीत ठेवलं आहे. तर सपनाला वन स्टॉप सेंटरला पाठवण्यात आलं आहे.

डीएसपी महेश कुमार यांनी म्हटलं की, हे प्रकरण कुटुंबातील वादविवादामुळे घडलं आहे. महिला आणि तिच्या कुटुंबातील लोकांचं समुपदेशन केलं जात आहे. आरोपींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, सपना देवी आणि राहुल यांच्यात 14 वर्षांच्या वयाचं अंतर आहे. सपनाच्या मुलीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आता गमावलं आहे. सपनानेही तिच्या मुलीशी नातं तोडलं आहे.

हे ही वाचा >> Today Gold Price: आता आपण फक्त आकडे मोजायचे... याचा 'पॅटर्नच' आहे वेगळा, सोन्याचे भाव ऐकून फुटेल घाम!

    follow whatsapp