Nashik Crime News : नाशिकमध्ये कार्यरत असलेले इन्कम टॅक्स अधिकारी हरेराम पांडे यांचा वारणसी येथील मोहिनीशी साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमात तिने तिचा प्रियकर सुरेश पाण्डेयला मिठी मारली होती. त्यानंतर या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचं हरेराम यांना कळलं. हरेराम यांनी मोहिनीला सांगितलं की, तू त्याला सोडून दे तरच तुझ्याशी लग्न करेन. यावर मोहिनीने हरेराम यांनाच धमकी दिली. ती म्हणाली की, मी त्याला सोडणार नाही. मात्र, तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही, तर तुझ्यासह कुटुंबियांवर हुंडा मागितल्याची तक्रार दाखल करेल. यामुळे हरेराम यांनी बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलिसांनी मोहिनी पांडे, सुरेश पांडे, आणि मयंक मुनेंद्र पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ससूनच्या अहवालामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा? निष्कर्षात नेमकं म्हटलंय तरी काय?
नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या का केली?
मिळालेल्या माहितीनुसार, हरेकृष्ण पांडे यांचा उत्तर प्रदेशमधील एका तरुणीसोबत साखरपूडा झाला होता. पण साखरपूडा समारंभात नवरीने एका मुलाला मिठी मारली. त्यानंतर नवऱ्याचा संशय बळावला आणि हा तरुण नेमका कोण आहे? असा प्रश्न त्यांना पडला. परंतु, नवरीने मिठी मारलेला तरुण हा तिचा प्रियकर असल्याचं पांडे यांना कळलं. त्यानंतर पांडेला जोरदार धक्का बसला.
साखरपुड्याच्या दिवशीच हा धक्कादायक प्रकार घडल्याने पांडे यांचा मानसिक तणाव वाढला. त्यांनी त्या तरुणीला लग्नास नकार दिला. मात्र होणाऱ्या नवरीने पांडे यांना हुंड्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. लग्न कर नाहीतर तुझ्यावर खोटी केस दाखल करेन, अशी धमकी त्या तरुणीने पांडे यांना दिली होती. त्यानंतर पांडेंचा तणाव वाढला आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हरेकृष्णा यांचा साखरपूडा उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे झाला होता.
हे ही वाचा >> वकील महिलेची पूर्ण पाठ काळी-निळी केली, रिंगण करून मारलं.. आरोपी गावातीलच हैवान!
ADVERTISEMENT
