India Today-Axis My Exit Poll Maharashtra BJP : लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे.या एक्झिट पोलमध्ये लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्राचा निकाल काय लागणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने मागील अडीच वर्षात ज्या आक्रमकपणे महाराष्ट्रात राजकारण केलं आहे त्यामुळे त्यांचे विरोधक हे अत्यंत ताकदीने एकत्र आले आहेत. एकीकडे भाजपने महायुतीच्या साथीने महाराष्ट्र काबीज करण्याची रनणिती आखलेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तेवढ्याच ईर्षेने निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. पण असं असलं तरी यंदाच्या निवडणुकीतही भाजप 22 जागा जिंकणार असल्याचा अंदाज इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. (india today axis my india maharashtra exit poll bjp won these seats in maharashtra full list of exit poll prediction lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग 23 जागा जिंकण्याचा विक्रम महाराष्ट्रात केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप हा विक्रम मोडेल असा अंदाज होता. मात्र भाजपला यावेळेस 20 ते 22 जागा जिंकता येतील असा अंदाज इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलने वर्तवला आहे.
हे ही वाचा : फडणवीस-पवारांची प्रतिष्ठा पणाला, माढ्यात कोण उधळतंय गुलाल?
मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची शिवसेनेची युती होती. ज्याचा थेट फायदा त्यांना त्यावेळी झाला होता. मात्र, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट या गोष्टींचा नेमका भाजपला फायदा होणार की तोटा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक्झिट पोलनुसार, यंदाच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात तब्बल 22 जागा जिंकू शकतात. ज्या मागील निवडणुकींमधील जागांपेक्षा एक जागा कमी आहे.
इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंडिया टूडे अॅक्सिस माय एक्झिट पोलनुसार, महायुतीला राज्यात 48 पैकी तब्बल 28 ते 32 जागा मिळू शकतील, यामध्ये राज्यात 48 पैकी 20 ते 22 जागा या भाजपला मिळतील. शिवसेना (शिंदे गट) 8 ते 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 1 ते 2 जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात.
तर महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 16 ते 20 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (UBT)पक्षाला 9 ते 11, काँग्रेसला 3 ते 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 3 ते 5 जागांवर उमेदवार विजय मिळवू शकतात.
हे ही वाचा : Solapur Lok Sabha : राम सातपुतेंबद्दल एक्झिट पोल काय सांगतो?
India Today-Axis My Exit Poll नुसार भाजप महाराष्ट्रातील कोणकोणत्या जागा जिंकणार?
1. नंदूरबार - हिना गावित (भाजप)
2. दिंडोरी - भारती पवार (भाजप)
3. जळगाव - स्मिता वाघ (भाजप)
4. धुळे - सुभाष भामरे (भाजप)
5. रावेर - रक्षा खडसे (भाजप)
6. अहमदनगर - सुजय विखे (भाजप)
7. लातूर - सुधाकर श्रृंगारे (भाजप)
8. बीड - पंकजा मुंडे (भाजप)
9. जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
10. मुंबई उत्तर - पियूष गोयल (भाजप)
11. मुंबई उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप)
12. नागपूर - नितीन गडकरी (भाजप)
13. अमरावती - नवनीत राणा (भाजप)
14. अकोला - अनुप धोत्रे (भाजप)
15. वर्धा - रामदास तडस (भाजप)
16. गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप)
17. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप)
18. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)
19. पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप)
20. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
21. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप)
22. पालघर - हेमंत सावरा (भाजप)
Exit Poll नुसार, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होणार?
1. नंदूरबार - हिना गावित (भाजप)
2. दिंडोरी - भारती पवार (भाजप)
3. जळगाव - स्मिता वाघ (भाजप)
4. धुळे - सुभाष भामरे (भाजप)
5. रावेर - रक्षा खडसे (भाजप)
6. नाशिक - राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
7. शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट)
8. अहमदनगर - सुजय विखे (भाजप)
9. हिंगोली - बाबूराव कदम-कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)
10. कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
11. ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
12. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
13. मावळ - संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट)
14. यवतमाळ - संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट)
15. छ. संभाजीनगर - संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
16. हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)
17. लातूर - सुधाकर श्रृंगारे (भाजप)
18. धाराशिव - ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
19. परभणी - संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट)
20. बीड - पंकजा मुंडे (भाजप)
21. नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
22. जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
23. मुंबई उत्तर - पियूष गोयल (भाजप)
24. मुंबई उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप)
25. मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
26. मुंबई उत्तर पश्चिम - रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
27. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
28. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
29. नागपूर - नितीन गडकरी (भाजप)
30. अमरावती - नवनीत राणा (भाजप)
31. अकोला - अनुप धोत्रे (भाजप)
32. वर्धा - रामदास तडस (भाजप)
33. गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप)
34. रामटेक - अशोक पारवे (शिवसेना शिंदे गट)
35. चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
36. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप)
37. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)
38. पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप)
39. सांगली - विशाल पाटील (अपक्ष)
40. शिरूर - अमोल कोल्हे (NCP शरद पवार)
41. बारामती - सुप्रिया सुळे (NCP शरद पवार)
42. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
43. कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट)
44. सोलापूर - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
45. रायगड - सुनील तटकरे (NCP अजित पवार)
46. भिवंडी - सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार)
47. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप)
48. पालघर - हेमंत सावरा (भाजप)
ADVERTISEMENT