Rahul Gandhi: नवी दिल्ली: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी लोकसभेत आज (14 डिसेंबर) चर्चा सुरू आहे. याच दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी हे एकमेकांना भिडले. सावरकरांच्या मुद्द्यावरून बोलताना श्रीकांत शिंदेंनी थेट 'तुमच्या आजी या संविधानविरोधी होत्या का?' असा सवाल शिंदेंनी विचारल्यावर राहुल गांधींनीही त्यांना तात्काळ प्रत्युत्तर दिलं. (indira gandhi told me that savarkar had apologized to the british rahul gandhi direct reply to shrikant shinde in lok sabha)
ADVERTISEMENT
सावरकरांच्या मुद्द्यावरून श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा
लोकसभेत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, 'सावरकरांबाबत बोललं जात आहे. मला यांना विचारायचं आहे की, हे जे सावरकरांचा जो अपमान करत आहेत.. त्यांचे सहकारी जे बसले असतील.. शिवसेना UBT वाले. ही गोष्ट त्यांना UBT वाल्यांना मान्य आहे का? सावरकरांबाबत जे बोलतात त्या विषयी..'
हे ही वाचा>> Allu Arjun Released : तुरूंगाबाहेर येताच अल्लू अर्जुन म्हणाला ज्या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झाला, त्यांना...
'राहुलजी.. मी तुम्हाला तुमची आजी इंदिरा गांधीजी काय म्हणाल्या होत्या ते तुम्हाला सांगू इच्छिते. त्यांनी 1980 साली लिहलेल्या एका पत्रात स्वातंत्र्यवीर सावकरांबाबत गौरवोद्गार काढले होते. त्यामुळे मी तुम्हाला विचारू इच्छितो की, तुमची आजी देखील संविधानविरोधी होत्या का?'
'तुम्हाला तर सवय आहे की, सावरकरांबाबत रोज चुकीच्या गोष्टी बोलत राहणं. मला असं वाटतं की, सावरकरांची पूजा.. होय.. सावरकरांची पूजा आम्ही रोज करतो आणि आम्हाला अभिमान आहे.' असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
राहुल गांधींचं श्रीकांत शिंदेंना प्रत्युत्तर...
श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधी यांचं नाव घेऊन जेव्हा त्यांना सवाल विचारले तेव्हा राहुल गांधींनी तात्काळ यावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, 'इंदिरा गांधीजी यांचं सावरकरांबाबत काय मत होतं. मी हा प्रश्न इंदिरा गांधींना विचारला होता. मी जेव्हा छोटा होतो तेव्हा मी त्यांना विचारलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की, इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, सावरकरांनी ब्रिटिशांसोबत तडजोड केली होती. त्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती.'
हे ही वाचा>> Kangana Ranaut: PM नरेंद्र मोदी का भेटतात बॉलिवूड सेलिब्रिटींना? कंगना राणौतनं दिलं खळबळजनक उत्तर, म्हणाली...
'इंदिरा गांधी यांनी सांगितलं की, गांधीजी तुरुंगात गेले.. नेहरूजी तुरुंगात गेले.. आणि सावरकरांनी माफी मागितली होती. हे इंदिरा गांधींचं मत होतं.' असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
