Mumbai Tak Chavadi : ''... नाहीतर ठाकरे, पवारांनी भाजप संपवली असती''

Mumbai Tak Chavadi, Kirit Somaiya : आम्ही कोणत्याही नेत्याची केस मागे घेतली नाही. त्यांच्यावर कारवाई सूरू असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे भ्रष्टाचार अजिबात चालणार नाही. जर परत असे भ्रष्टाचार सुरू झाले तर किरीट सोमय्या पुन्हा आवाज उठवणार. सत्तेतल्या नेत्यांचाही भ्रष्टाचार समोर आला तरी मी ऐकणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

विरोधी पक्षाला संपवलं असतं, जेलमध्ये टाकलं असतं,

lok sabha election 2024 kirit somaiya big statement on mumbai tak chavadi sharad pawar udhhav thackeray maharashtra politics

मुंबई तक

04 Apr 2024 (अपडेटेड: 04 Apr 2024, 10:54 PM)

follow google news

Mumbai Tak Chavadi, Kirit Somaiya : मुंबई तकच्या चावडीवर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हजेरी लावली होती. यावेळी किरीट सोमय्या यांनी अनेक मुद्यावर दिलखुलास उत्तरे दिली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी  अनेक सत्ताधारी नेत्यांचे घोटाळेबाहेर काढून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लावला होता. या कारवाईंवर आता सोमय्या म्हणतात, जर हे घोटाळे बाहेर काढले नसते, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपा संपवली असती, विरोधी पक्षाला संपवलं असतं, जेलमध्ये टाकलं असतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी मुंबई तकच्या चावडीवर केला आहे. (lok sabha election 2024 kirit somaiya big statement on mumbai tak chavadi sharad pawar udhhav thackeray maharashtra politics) 

हे वाचलं का?

ठाकरे सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्यामागे चौकशी लावणे ही तेव्हाजी राजकीय गरज होती. जर तसे नाही केले नसते तर, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप संपवली असती, विरोधकांना संपवलं असतं. जेलमध्ये टाकलं असतं, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. भाजप नेत्यांचं आधीच ठरलं होतं, यापुढे भ्रष्टाचार नाही. म्हणून आम्ही कोणत्याही नेत्याची केस मागे घेतली नाही. त्यांच्यावर कारवाई सूरू असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे भ्रष्टाचार अजिबात चालणार नाही. जर परत असे भ्रष्टाचार सुरू झाले तर किरीट सोमय्या पुन्हा आवाज उठवणार. सत्तेतल्या नेत्यांचाही भ्रष्टाचार समोर आला तरी मी ऐकणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : निंबाळकरांसमोर अजित पवारांनी उतरवला उमेदवार, कोण आहेत अर्चना पाटील?

मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश मला देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतून देण्यात आले होते. माझा याला नकार होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा पक्षाचा आदेश आहे, असे सांगत मला भ्रष्टाचार बाहेर काढायला लावले, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. 

हे ही वाचा : काँग्रेसने भिवंडीची जागाही गमावली, पवारांनी जाहीर केला उमेदवार

वाशिममध्ये भावना गवळीच्या मतदार संघात गावातल्या एका रस्त्यात लोकांनी मला घेराव केला होता.  दगडफेक केली. जेम तेम वाचलो होतो. या घटनेच्या 10 मिनिटानंतर अमित शाह यांचा फोन आला आणि विचारणा झाली कुठे लागलं का? आणि दुसऱ्या दिवशी मला झेड सिक्युरीटी मिळाली. पक्षाने मला ही सिक्युरीटी देऊन माझ्या कामाची पोचपावती दिली होती, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. 

    follow whatsapp