Modi Cabinet 2024 : पुण्याचा माजी महापौरांची मोदींच्या मंत्रिमंडळात एन्ट्री, मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास

मुंबई तक

• 04:29 PM • 09 Jun 2024

Modi Cabinet 2024 : महाराष्ट्रातून पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे नगरसेवक, महापौर आणि आता थेट केंद्रात मंत्रीपद मिळवणारे मुरलीधर मोहोळ कोण आहे?

murlidhar mohol pune mp profile mp minister in modi cabinet pm narendra modi oath taking ceremony

महाराष्ट्रातून पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

follow google news

MP Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत जवळपास 30 ते 40 मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा देखील समावेश असणार आहे. महाराष्ट्रातून पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे नगरसेवक, महापौर आणि आता थेट केंद्रात मंत्रीपद मिळवणारे मुरलीधर मोहोळ कोण आहे? हे जाणून घेऊयात. (murlidhar mohol pune mp profile mp minister in modi cabinet pm narendra modi oath taking ceremony) 

हे वाचलं का?

कोण आहेत मोहोळ? 

मुरलीधर मोहोळ यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1974 रोजी मुळशीमध्ये झाला आहे. 

पुण्यात दहावीपर्यंत शिक्षण पुर्ण करून मोहोळ यांनी 1999 मध्ये कोल्हापूर गाठलं. 

कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीत मोहोळ यांनी बीएचे शिक्षण घेतले होते. येथेच त्यांना कुस्तीची आवड झाली होती. 

मुरलीधर मोहोळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे.  

तर बूथ प्रमुख म्हणून मोहोळ यांनी भाजपमध्ये कामाला सुरुवात केली होती.

मोहोळ यांनी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदही भूषवले आहे. तब्बल 30  वर्षे संघटनेत ते कार्यरत होते. 

हे ही वाचा : PM Modi new cabinet list : मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी? पाहा संपूर्ण यादी

पुणे महानगरपालिकेत 2002, 2007 आणि 2017 मध्ये कोथरूडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 

2017-2018 मध्ये पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपदही सांभाळलं. 

2019-2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते. 

मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली होती. कोरोना काळात जनतेत उतरून त्यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळली होती.

2020 मध्ये त्यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. 

2022 मध्ये त्यांची महाराष्ट्र भाजपच्या सरचिटणीसपदीही निवड झाली होती. याचवर्षी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या भाजपची जबाबदारी सांभाळली होती. 

हे ही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाकारलं मंत्रिपद, काय बिनसलं? Inside Story

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचा पराभव करून मुरलीधर मोहोळ यांनी निवडणूक जिंकली होती.

आता पहिल्याच टर्ममध्ये खासदार झाल्यानंतर मंत्रीपदाची माळ देखील त्यांच्या गळ्यात पडणार आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना लॉटरीच लागली आहे. 

    follow whatsapp