Exit Poll : शरद पवार 'इतक्या' जागा जिंकणार? अजित पवारांना किती? पाहा यादी

मुंबई तक

• 09:40 AM • 03 Jun 2024

Maharashtra Lok Sabha Exit Polls : महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा लढवल्या आहेत.

शरद पवार आणि अजित पवार.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ अंदाज

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळणार जागा?

point

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा जिंकणार?

Sharad Pawar NCP Exit poll : खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा लढा कोर्टात सुरू असला, तर जनतेच्या न्यायालयातील निकाल ४ जून रोजी येणार आहे. महायुतीमध्ये सामील झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा लढवल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या आहेत. कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार, याबद्दल महाराष्ट्रातील रुद्रा रिसर्च एक्झिट पोलने धक्कादायक निकाल दिला आहे. (Rudra Research exit poll predicts that Sharad pawar's NCP will win 8 seats in lok sabha elections 2024)
  
राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 48 पैकी दोन मतदारसंघातच अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये 'हे' उमेदवार जिंकणार? बघा संपूर्ण यादी 

या दोन्ही मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता रुद्रा रिसर्चच्या एक्झिट पोलने म्हटले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्र्रवादी काँग्रेसला एक जागा मिळेल, असा अंदाज मांडला आहे. 

Maharashtra Lok Sabha : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या 8 जागा जिंकू शकते?

1. सातारा लोकसभा मतदारसंघ

शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
उदयनराजे भोसले (भाजप) - पराभवाची शक्यता

2. माढा लोकसभा मतदारसंघ

धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) - पराभवाची शक्यता

3. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

निलेश लंके (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
सुजय विखे (भाजप) - पराभवाची शक्यता

4. शिरूर लोकसभा मतदारसंघ 

अमोल कोल्हे - (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

5. बारामती लोकसभा मतदारसंघ

सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

6. भिवंडी लोकसभा मतदारसंघ

सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
कपिल पाटील (भाजप) - पराभवाची शक्यता
निलेश सांबरे (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

7. वर्धा लोकसभा मतदारसंघ

अमर काळे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
रामदास तडस (भाजप)- पराभवाची शक्यता

8. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

भास्कर भगरे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
भारती पवार (भाजप) - पराभवाची शक्यता

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा?

रुद्रा रिसर्च एक्झिट पोलनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा मिळू शकते. 

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे जिंकू शकतात, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते पराभूत होऊ शकतात, असा अंदाज या एक्झिट पोलचा आहे. 

बारामतीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने जिंकणार?

अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी बारामतीची लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. अजित पवारांनी संपूर्ण निवडणुकीदरम्यान बारामतीवर लक्ष्य केंद्रीत केले होते. पण, तरीही शरद पवारांची सरशी होऊ शकते, असे हा एक्झिट पोल सांगतो.

हेही वाचा >> महाविकास आघाडीचा तब्बल 'एवढ्या' जागांवर होणार विजय? पाहा यादी

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या 1 लाख 70 हजार ते 2 लाख 30 हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने जिंकू शकतात, असा अंदाज मांडला आहे. असा निकाल लागल्यास अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल.

हेही वाचा >> ठाकरे महाराष्ट्रात जिंकणार 'इतक्या' जागा, ही आहे संपूर्ण यादी! 

दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी शिवसेनेतून आलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली. पण, त्यांचाही पराभव होऊ शकतो, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. 2 लाख 20 हजार ते 2 लाख 70 हजार इतक्या मताधिक्याने अमोल कोल्हे हे जिंकू शकतात, असा अंदाज रुद्रा एक्झिट पोलचा आहे. त्यामुळे निकालाबद्दल उत्कंठा वाढली आहे. 

    follow whatsapp