Sanjay Raut Criticize Eknath Shinde: राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत होणार आहे. मात्र अद्याप दोन्ही आघाड्यांचे जागावाटप जाहीर झाले नाही आहे. अशात महायुतीच्या जागावाटपावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात, त्यांना मागण्याचा हक्क नसतो, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर (Eknath shinde) टीका केली आहे. (sanjay raut criticize eknath shinde on mahayuti lok sabha seat sharing maha vikas aghadi shiv sena maharashtra politics)
ADVERTISEMENT
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या जागावाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. उद्धव ठाकरेंनी संभाव्य उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या जातात. पण महाविकास आघाडीत असल्यामुळे उद्या यादी जाहीर करू, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच महायुतीच्या जागावाटपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. ते मांडलिक आश्रित असतात. त्यांना मागण्याचा हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. तसेच आमचे जागावाटप महाराष्ट्रतच होते. आम्हाला दिल्लीला जावून नेत्यांच्या लॉनवर रूमाल टाकून बसावे लागत नाही, असा हल्लाही राऊतांनी शिंदेंवर चढवला होता.
हे ही वाचा : Shiavajirao Adhalrao Patil : ''दादा माझा राजीनामा घ्या...'',
वंचित बहुजन आघाडी हा मविआतील महत्वाचा घटक पक्ष आहे. आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधतोय. संवाद कायम ठेवलेला आहे. मागेपुढे थोडे होते. 4 जागांचा प्रस्ताव दिला त्यात अकोलाही आहे. तो त्यांना मान्य नाही. आम्ही पुन्हा त्यांच्याशी चर्चा करू. वंचित आमच्यासोबत असायला हवी, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.
महादेव जानकरांच्या महायूतीतील प्रवेशावर बोलताना राऊत म्हणाले की, गळालाच लावतात ते...आणि गाळात घालतात.जानकरांचा तो निर्णय आहे. बारामतीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील. मीही सभा घेतलीय, वेळ पडली तर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील. सुप्रियाताई जिंकून येणार असल्यानं तिथे कुणी लढायला तयार नाही.मग कुणालाही गळाला लावू द्या, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT