Solapur Lok Sabha Election 2024, praniti Shinde, Ram Satpute, bhagirath bhalke : धैर्यशील मोहिते पाटलांसह विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा शरद पवारांसोबत गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील समीकरण बदललं आहे. मोहिते पाटलांनी धक्का दिल्याने भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना निवडणूक जड जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका नेत्याने प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. पंढरपूरचे माजी आमदार स्व. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. (Bhagirath Bhalke Extended Support to Praniti Shinde from Solapur lok sabha election)
ADVERTISEMENT
माढ्याबरोबरच सोलापूर लोकसभेची निवडणुकही चर्चेचा विषय ठरलेली आहे. कारण या लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याविरोधात धैर्यशील मोहिते पाटलांनीच दंड थोपटले आहेत.
प्रणिती शिंदेंना भगीरथ भालकेंचा पाठिंबा
पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात ताकद असलेल्या भगीरथ भालके यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा जाहीर केला. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भगीरथ भालके सध्या के.सी. राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये आहेत.
हेही वाचा >> बाळासाहेबांचा 'धनुष्यबाण' कोकणातून हद्दपार...
भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभेची निवडणूक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भगीरथ भालके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
हेही वाचा >> "देवेंद्रजींना कोणत्याही क्षणी अटक होणार होती", पाटलांचा गौप्यस्फोट
भाजपचे समाधान औताडे या निवडणुकीत विजयी झाले होते. भगीरथ भालके यांना 1 लाख 5 हजार मते मिळाली होती. तर औताडे यांना 1 लाख 9 हजार मते मिळाली होती. अटीतटीच्या लढतीत भालके यांचा निसटता पराभव झाला होता.
हेही वाचा >> शिंदेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा गमावली; भाजपने जाहीर केला उमेदवार
विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना पक्षात घेत शरद पवारांनी त्यांच्या नावाची विधानसभेचे उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे भगीरथ भालके दुखावले गेले आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते.
प्रणिती शिंदेंसाठी सुशीलकुमार शिंदेंकडून बेरजेचं राजकारण
सोलापूर लोकसभा लढवत असलेल्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत. आधी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला जात शिंदेंनी पाटलांची साथ मिळवली. इतकंच नाही, तर नरसय्या आडम यांनाही सोबत घेण्यात शिंदेंना यश आलं आहे. आता भालके यांच्यासोबत जुळवून घेण्यातही शिंदेंना यश आलं आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंचा विजय सोपा करण्यासाठी शिंदे झटत असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे.
ADVERTISEMENT