Maharashtra Loksabha Election 2024 Exit Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2-24) मध्ये महाराष्ट्रातून नेमकं कोण विजयी होणार याबाबतची उत्सुकता ही आता शिगेला पोहचली आहे. निकालाला आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. अशातच आता tv9 polstrat यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.. (tv9 polstrat exit poll who can win in maharashtra 48 constituencies see the full list lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
शिवसेना (UBT) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे राज्यात निवडणूक लढवली. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना - शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार म्हणजेच महायुती मिळून निवडणूक लढवली. अशावेळी राज्यात 48 जागांवर नेमका कोणाचा उमेदवार जिंकणार याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्याचबाबत एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
TV9 Polstrat Exit Poll नुसार 48 मतदारसंघातील विजयी उमेदवार
1) दक्षिण मुंबई : अरविंद सावंत – ठाकरे गट (आघाडीवर) विरुद्ध यामिनी जाधव शिंदे गट (पिछाडीवर)
2) दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट
3) उत्तर पश्चिम मुंबई : अमोल कीर्तिकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट
4) बुलढाणा : नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध प्रतापराव जाधव – शिंदे गट
5) ठाणे : राजन विचारे – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट
6) कल्याण : श्रीकांत शिंदे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट
7) नाशिक: राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट
8) औरंगाबाद : चंद्रकांत खैरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट
9) हिंगोली : नागेश पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट
10) यवतमाळ : संजय देशमुख – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट
11) हातकणंगले : सत्यजीत पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट
12) मावळ : श्रीरंग बारणे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट
13) शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट
14) बारामती : सुप्रिया सुळे- शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी
15) शिरुर : डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी
16) उत्तर मुंबई : पियूष गोयल – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस
17) उत्तर मध्य मुंबई : वर्षा गायकवाड – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उज्वल निकम – भाजप
18) नंदुरबार : डॉ. हिना गावित – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस
19) धुळे : सुभाष भामरे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस
20) जालना : रावसाहेब दानवे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस
21) लातूर : शिवाजीराव काळगे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे – भाजप
22) नांदेड : प्रताप चिखलीकर – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस
23) अकोला : अनुप धोत्रे – भाजप विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
24) अमरावती : नवनीत राणा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस
25) नागपूर : नितीन गडकरी – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस
26) भंडारा-गोंदिया : सुनील मेंढे – भाजप विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
27) गडचिरोली : अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
28) चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप
29) पुणे : मुरलीधर मोहोळ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस
30) सोलापूर : प्रणिती शिंदे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध राम सातपुते – भाजप
31) भिवंडी : कपिल पाटील – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट
32) दिंडोरी : भास्करराव भगरे – शरद पवार (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप
33) रावेर : रक्षा खडसे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट
34) बीड : पंकजा मुंडे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बजरंग सोनवणे – शरद पवार गट
35) वर्धा : रामदास तडस – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अमर काळे – पवार
36) माढा : धैर्यशील पाटील – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप
37) सातारा : शशिकांत शिंदे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप
38) अहमदनगर : निलेश लंके – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुजय विखे पाटील – भाजप
39) मुंबई उत्तर पूर्व : संजय दिना पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप
40) पालघर : डॉ. हेमंत सावरा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे
41) सिंधुदुर्ग : नारायण राणे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट
42) जळगाव : स्मिता वाघ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट
43) सांगली : संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (जिंकण्याची शक्यता)
44) रायगड : अनंत गीते – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी
45) धाराशिव : ओमराजे निंबाळकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी
46) परभणी : संजय जाधव – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रवादी
47) रामटेक : राजू पारवे – शिवसेना (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
48) कोल्हापूर : शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजय मंडलिक – शिवेसना
tv9 polstratच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 25 जागा मिळू शकतील. तर महायुतीला राज्यात 48 पैकी केवळ 13 जागांवरच मिळू शकतो असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. तर एक अपक्ष देखील निवडून येण्याचा अंदाज हा वर्तविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT