Janhvi Kapoor Hospitalized : जान्हवी कपूर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

मुंबई तक

• 11:21 PM • 18 Jul 2024

Janhvi Kapoor Hospitalized : गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूरची प्रकृती ठीक नव्हती. आज (गुरुवारी) तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या जान्हवाची प्रकृती स्थिर असून एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 janhavi kapoor haspitalised due to food poisoning bony kapoor share update bollywood news

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची अचानक प्रकृती बिघडली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

जान्हवी कपूरची अचानक प्रकृती बिघडली

point

अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

point

वडील बोनी कपूर यांनी माहिती दिली

Janhvi Kapoor Health Update :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तिला  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडील बोनी कपूर यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई आल्यानंतर तिची प्रकृती बिघडली त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने जान्हवीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.  (janhavi kapoor haspitalised due to food poisoning bony kapoor share update bollywood news) 
 
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूरची प्रकृती ठीक नव्हती. आज (गुरुवारी) तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या जान्हवाची प्रकृती स्थिर असून एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Manoj Jarange: 'तू फडणवीसाचे पाय चाट, %$ खा..', BJP आमदार प्रसाद लाडांना जरांगेंची शिवीगाळ

 दरम्यान जान्हवी नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात सहभागी झाली  होती. यावेळी लग्नात ती तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत हातात हात घालून एंट्री करताना दिसली होती. अभिनेत्री येथे खूप मस्ती करताना आणि डान्स करताना दिसली होती.
 
 जान्हवी आणि राधिका चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यांनी कुटुंबाप्रमाणे या लग्नाला हजेरी लावलीहोती. या लग्नात जान्हवीने परफॉर्मन्स देखील दिला होता. जान्हवीने या दरम्यान एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करून जान्हवीने सांगितले होते की, तिला डान्स करण्यासाठी तिच्या लेहेंगाचे हेम्स कापावे लागले. यामध्ये तिला तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने सपोर्ट केला होता.

जान्हवीच्या  वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच जान्हवीच्या उलझ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. चाहत्यांना हा ट्रेलर आवडला आहे. अभिनेत्रीच्या कामाचेही खूप कौतुक होत आहे. उलझ लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जान्हवी या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या अवतारात आणि शैलीत दिसणार आहे.

हे ही वाचा : Jalna Accident : 'त्याला' वाचवायला गेला अन् सात जणांनी जीव गमावला, जालन्यात काय घडलं?

या चित्रपटात जान्हवी सुहाना भाटिया या तरुण उपउच्चायुक्ताची भूमिका साकारत आहे, जिला तिच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचा तिरस्कार आहे. कारण घराणेशाहीच्या मदतीने मोठे पद मिळविल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे. तसेच हे पद मिळवण्याच्या ती लायकीची नाही, असे तिच्या सहकाऱ्यांना वाटते. तिला वाईट वागणूक दिली जाते.

दरम्यान उलझ 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून, गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, मियांग चांग आणि आदिल हुसैन यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय जान्हवीच्या खात्यात आणखी दोन मोठे चित्रपट आहेत, ज्यात ज्युनियर एनटीआरसोबत देवरा: भाग 1 आणि सनी संस्कारीचा तुलसी कुमारी या चित्रपटाचा समावेश आहे.

    follow whatsapp